मुंबई – ‘MS धोनी’ आणि ‘कबीर सिंह’ यांसारख्या सिनेमांनंतर प्रसिद्ध झालेली अभिनेत्री कियारा अडवाणी आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींमध्ये कियारा अडवाणी गणली जाते. कियाराने 2014 मध्ये ‘फगली’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. मात्र, 2016 मध्ये आलेल्या MS धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाने कियाराला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली आहे.
नुकतंच, (दि. 31 जुलै) अभिनेत्री कियारा अडवाणीने तिचा 31 वा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कियारा आणि तिचा पती म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोबत समुद्रात उडी मारताना दिसत आहेत.
यावेळी तिने ब्लॅक कलरची मोनोकिनी (बिकिनी) घातली आहे. या बिकिनीची किंमत जवळपास 65 हजार रुपये असल्याचं सांगण्यात आलं आहे. तिच्या या बिकिनीची किंमत ऐकून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ आतापर्यंत 25 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केला असून, सोशल मीडियावर या ब्लॅक बिकिनीची चांगलीच चर्चा रंगली आहे.
View this post on Instagram
कियारा आडवाणीनं काही महिन्यांपूर्वी (दि. 7 फेब्रुवारी) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. राजस्थानच्या सूर्यगढ़ पॅलेसमध्ये कियारा आणि सिद्धार्थ यांचा विवाह सोहळा पार पडला. अतिशय मोजक्या लोकांमध्ये हा सोहळा पार पडला होता. गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना डेट करत होते.