Kiara Advani : ‘वॉर 2’च्या टीझरमध्ये दिसला प्रेग्नंट ‘कियारा’चा बिकिनी अवतार; अभिनेत्री स्वतः म्हणाली….

War2 | Kiara Advani Bikini : 2019 मध्ये रिलीज झालेल्या ‘वॅार’ या चित्रपटाने बॉलिवूड इंडस्ट्रीत धूमाकूळ घातला होता. या चित्रपटात हृतिक रोशन आणि टायगर श्रॅाफ यांनी आपल्या दमदार अभिनय आणि अॅक्शनमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
चित्रपटात दाखविण्यात आलल्या अॅक्शन सीन्सचे मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात आले. यानंतर चित्रपटाच्या मेकर्सनी ‘वॅार 2’ ची घोषणा करून चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या पुढच्या भागाविषयी उत्सुकता निर्माण केली होती.
अखेर प्रतीक्षा संपली असून ‘वॅार 2’ चा खतरनाक टीझर रिलीज झाला आहे. 14 अॅागस्ट हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या टीझरने सर्वत्र धूमाकूळ उडवून दिला आहे. यामुळे ट्रेलर आणि चित्रपट कसा असेल याविषयी चर्चा केली जात आहे.
‘वॉर 2’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर हृतिक पुन्हा एकदा कबीर या पात्रातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये कियाराची फक्त एक झलक दिसली.
पण फक्त एका नजरेने, कियाराने संपूर्ण लाइमलाइट चोरली आहे. या चित्रपटात कियाराचा अतिशय ग्लॅमरस लूक पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये ती बिकिनी बोल्ड लूकमध्ये दिसली. पहिल्यांदाच कियाराने बिकिनी शॉट्स दिले आहेत.
तिने पॅरट ग्रीन रंगाच्या बिकिनीमध्ये हॉट लूक दिला. कियाराचे कुरळे केस या लूकमध्ये दिसत आहेत. कियाराने या लूकमध्ये अतिशय हलका मेकअप केला. कियाराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत.
कियाराने इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत लिहिले, ‘या चित्रपटात पहिल्यांदाच अनेक गोष्टी घडल्या आहेत. पहिला YRF चित्रपट. पहिला अॅक्शन चित्रपट. पहिल्यांदाच दोन अद्भुत नायकांसोबत काम करत आहे. अयान मुखर्जीसोबत पहिल्यांदाच काम करत आहे आणि पहिल्यांदाच बिकिनी शूट करत आहे. अशी पोस्ट तिने शेअर केली आहे.
कियारा अडवाणी लवकरच आई होणार आहे. सध्या ती तिच्या गर्भधारणेचा आनंद घेत आहे. ती नुकतीच मेट गालालाही गेली होती. मेट गालामध्ये कियाराचा हा पहिलाच कार्यक्रम होता. तिने मेट गालामध्ये तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर केले. यादरम्यान कियाराचा पती सिद्धार्थ मल्होत्राही तिच्यासोबत होता.






