Kiara Advani : कियारा आणि सिद्धार्थच्या घरी पाळणा हलणार; क्युट फोटोसोबत चाहत्यांना दिली गुड न्युज !

Kiara Advani | Sidharth Malhotra : बॉलिवूडचे लव्हबर्ड्स कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा त्यांच्या स्ट्रॉंग बाँडिंगमुळे नेहमीच चर्चेत राहतात. दोघांनीही त्यांच्या करिअरमध्ये कमी वेळात चांगली प्रगती केली.
चाहत्यांनाही त्यांची जोडी खूप आवडते आणि त्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. दरम्यान, अश्यातच या लव्हबर्ड्सने चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे.
इन्स्टाग्राम अकाऊंटवर कियाराने बाळाच्या पायातील मोज्यांचा फोटो पोस्ट केला आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या हातात हे मोजे आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, ‘आमच्या आयुष्यातील सर्वांत मोठी भेट लवकरच येत आहे…’ असं लिहलं आहे.
View this post on Instagram
कियाराने हा फोटो पोस्ट करताच चाहत्यांकडून त्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गेल्या महिन्यात कियारा आजारी असल्याची चर्चा होती. इतकंच नव्हे तर तिला रुग्णालयात दाखल केल्याचंही म्हटलं जात होतं. यामुळे ती तिच्या ‘गेम चेंजर’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमालाही उपस्थित राहिली नव्हती.
अशी झाली ‘कियारा-सिद्धार्थ’ची पहिल्यांदा भेट !
‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटाच्या रॅप अप पार्टीत कियारा आणि सिद्धार्थची पहिल्यांदा भेट झाली होती. या भेटीचं रुपांतर आधी मैत्रीत आणि त्यानंतर हळूहळू प्रेमात झालं. 2019 मध्ये या दोघांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं होतं.
त्यानंतर 2021 मध्ये कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांच्या कुटुंबीयांशी भेटले. कियाराने सिद्धार्थ आणि त्याच्या आईवडिलांना घरी डिनरसाठी बोलावलं होतं. याच भेटीनंतर दोन्ही कुटुंबीयांनी कियारा-सिद्धार्थच्या लग्नावर शिक्कामोर्तब केला.
यानंतर, दोन्ही कलाकारांनी फेब्रुवारी 2023 मध्ये राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लग्न केले. लग्नादरम्यानचे फोटो व्हायरल झाले होते. दोघेही त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चांगले संतुलन राखतात. सोशल मीडियावर सुद्धा त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सतत व्हायरल होत असतात.





