‘आम्ही खरेदी करणार नाही’ ; पाकचा चीनला मोठा धक्का, j-३५ लढाऊ विमानांबद्दल केले मोठे विधान

Khwaja Asif। पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी चीनचे प्रगत J-35A स्टेल्थ लढाऊ विमान खरेदी करण्याच्या वृत्तांना फेटाळून लावले आहे. एका मुलाखतीत त्यांनी या,”ज्याचा उद्देश केवळ चीनच्या संरक्षण करारांना प्रोत्साहन देणे आहे” असे म्हटले आहे.
जून २०२५ मध्ये, ब्लूमबर्ग आणि इतर आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थांनी दावा केला होता की, “पाकिस्तान चीनने विकसित केलेल्या J-35A स्टेल्थ लढाऊ विमानाचा पहिला परदेशी ग्राहक होणार आहे. हे विमान चीनच्या शेनयांग एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनने बनवलेले पाचव्या पिढीचे स्टेल्थ जेट आहे, जे आधुनिक तंत्रज्ञान आणि रडार-डोजिंग क्षमतेने सुसज्ज आहे. या वृत्तांनंतर, AVIC शेनयांग एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे शेअर्स अचानक १० टक्क्यांनी वाढले.
ख्वाजा आसिफ यांनी काय म्हटले?
एका अरब वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी, “आम्ही ते खरेदी करत नाही आहोत.” असे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांनी मीडियामध्ये सुरू असलेल्या बातम्या पूर्णपणे फेटाळून लावल्या आणि, “मला वाटते की ही फक्त माध्यमांमधील चर्चा आहे. ही चिनी संरक्षण विक्रीसाठी चांगली प्रसिद्धी आहे.”असे म्हटले आहे.
दावा काय होता?
अलिकडेच, ब्लूमबर्गसह अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तान चीनचे प्रगत J-35A स्टेल्थ लढाऊ विमाने खरेदी करणारा पहिला परदेशी देश ठरणार आहे. असेही वृत्त आहे की ही विमाने PL-17 लांब पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहेत. पाकिस्तानला ऑगस्ट 2025 पर्यंत त्यांची डिलिव्हरी मिळू शकते. पाकिस्तानी वैमानिकांना चीनमध्ये प्रशिक्षण दिले जात असल्याचेही वृत्त आहे. सुमारे 30-40 विमानांच्या फील्ड रेडिनेसवर काम पूर्ण झाले आहे. चीन या विमानांच्या करारावर 50% सूट देण्यास तयार आहे.
पाकिस्तान चीनकडून J-35 का खरेदी करू इच्छित नाही? Khwaja Asif।
1. मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सीमा संघर्ष आणि हवाई हल्ल्यांनंतर परिस्थिती संवेदनशील आहे. अशा परिस्थितीत, चीनकडून स्टेल्थ लढाऊ विमाने खरेदी करण्याची पुष्टी करणे हे भारतासाठी थेट चिथावणी मानली जाईल. यामुळे दक्षिण आशियातील शस्त्रास्त्र स्पर्धा तीव्र होऊ शकते. तसेच, भारतासोबत राजनैतिक तणाव आणखी वाढू शकतो.
2. पाकिस्तान सध्या IMF च्या कडक आर्थिक देखरेखीखाली आहे. अशा परिस्थितीत, अब्जावधी डॉलर्सचे लढाऊ विमान खरेदी करण्याची चर्चा त्याच्या आर्थिक शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकते. जाहीरपणे नकार देऊन, पाकिस्तान हे दाखवू इच्छितो की ते एक जबाबदार आर्थिक धोरण स्वीकारत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय समर्थन देखील कायम राहील.
३. अनेक विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, ही चीनची जाणीवपूर्वक केलेली चाल होती, ज्यामध्ये मीडियाद्वारे पाकिस्तानला खरेदीदार म्हणून संबोधून J-35A ला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्यात आले. अशा प्रकारे, इजिप्त, अल्जेरिया सारख्या देशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच वेळी, चीनकडून अधिकृत पुष्टी किंवा नकार मिळालेला नाही.





