आईच्या आठवणीत खुशी कपूर भावूक

Khushi Kapoor | बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक म्हणजे श्रीदेवी. दाक्षिणात्यसह हिंदी चित्रपटात देखील त्यांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांची मनं जिंकली. त्यांच्यानंतर आता दोन्ही मुलींनीही सिनेक्षेत्रात करियर करण्याचा निर्णय घेतला. जान्हवी कपूरने चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर आता तिची धाकटी बहीण खुशी कपूर लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. खुशी आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत ‘लव्हयापा’मध्ये दिसणार आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या कार्यक्रमात खुशी भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमादरम्यान, जेव्हा अभिनेत्रीला तिच्या आईबद्दल विचारण्यात आले की जर तिची आई या क्षणी तिच्यासोबत असती तर तिला कसे वाटले असते? तर खुशीने यावर उत्तर देत ती आज असती तर नक्कीच भावनिक झाली असती. पण हा एक असा मुद्दा आहे, ज्याबद्दल मी बोलू इच्छित नाही. Khushi Kapoor |
View this post on Instagram
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या आमिर खानने यावर बोलताना सांगितले की, श्रीदेवी एक अद्भुत अभिनेत्री होत्या. मी श्रीदेवीचा खूप मोठा चाहता आहे आणि नेहमीच मला तिच्यासोबत चित्रपट करायची इच्छा होती. पण मला श्रीदेवीसोबत काम करण्याची संधी मिळाली नाही, पण हा आनंदाचा चित्रपट आहे, जो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा क्षण आहे. Khushi Kapoor |
पुढे तो म्हणाला की, जेव्हा मी चित्रपट पाहिला तेव्हा मला वाटले की मी श्रीदेवीला पुन्हा पाहत आहे. मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो आणि श्रीदेवी कुठेही असेल, मला खात्री आहे की तिला खुशीचा खूप अभिमान असेल. मला अजूनही तिची खूप आठवण येते आणि ती आज इथे असती तर खूप छान झालं असतं,’ असे म्हणत आमिरने आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, खुशी कपूर आणि जुनैद खान स्टारर चित्रपट ‘लव्हयापा’ हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
अखेर ती आलीच! अंकिता वालावलकरने खरेदी केली ऑडी, गाडीला दिले ‘हे’ खास नाव





