Khed Assembly Election 2024 Live : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘बाबाजी काळे’ विजयी !

Khed Assembly Election 2024 | राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. त्यानंतर या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आज शनिवार 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
आज आठ वाजता एकाचवेळी मतांची मोजणी सुरू झाली असून, त्यासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. नुकतेच पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. चिंचवड, पिंपरी, भोसरी आणि मावळ या चारही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.
खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ हा शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. राजगुरुनगर खेड आळंदी मतदारसंघाचे मुख्यालय आहे. या मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगलंच वर्चस्व आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात काँग्रेसचा मोठा प्रभाव होता.
विधानसभेचे उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडून बाबा काळे यांना उमेदवारी दिली आहे.
2019चा निकाल काय होता?
2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप मोहिते यांनी विजय मिळवला. दिलीप मोहिते यांना एकूण 96866 मते मिळाली होती. शिवसेनेचे उमेदवार सुरेश नामदेव गोरे एकूण 63624 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांचा 33242 मतांनी पराभव झाला. या मतदारसंघात खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना ठाकरे पक्ष असा सामना होणार आहे.
खेड विधानसभा निकाल :
पहिल्या फेरीअंती बाबाजी काळे 1972 मतांनी आघाडीवर
दिलीप मोहिते पाटील 3487
बाबाजी काळे 5459
खेड आळंदी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळेंना चौथ्या फेरी अखेर 12165 मतांची आघाडी, पहिल्या फेरी पासुन महायुतीचे उमेदवार दिलीप मोहितेपाटील पिछाडीवर.
पाचवी फेरी –
दिलीप मोहिते – 3740
बाबाजी काळे – 7882
पाचवी फेरीत 4142 बाबाजी काळे आघाडीवर एकुण 16360 काळे मतांनी आघाडीवर
खेड आळंदी विधानसभा सातवी फेरी –
बाबाजी काळे २२२२२ मतांनी आघाडीवर
नववी फेरी –
दिलीप मोहिते – 4035
बाबाजी काळे – 8515
नववी फेरीत 4480 बाबाजी काळे आघाडीवर एकुण 30741 मतांनी आघाडीवर
दरम्यान, आता खेड आळंदी विधानसभा ठाकरेंच्या शिवसेनेचे बाबाजी काळे विजयी झाले आहेत. दिलीप मोहिते (राष्ट्रवादी घड्याळ) पराभूत झाले आहेत.





