Khavdya Dongar Case : चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ उलगडणार? नणंदेबाबतच्या ‘त्या’ जुन्या व्हिडीओने खळबळ
Khavdya Dongar Case : तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांचा (कुणाल, मुरलीधर आणि संगीता चांदगुडे) दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणातील गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत आहे.

Khavdya Dongar Case : खवड्या डोंगरावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेनंतर चांदगुडे कुटुंबातील कौटुंबिक वाद पुन्हा चर्चेत आला आहे. मुरलीधर, संगीता आणि कुणाल चांदगुडे या तिघांचा मृत्यू झाल्यानंतर संगीता चांदगुडे यांच्या जुन्या व्हिडीओमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. (Khavdya Dongar Case)
संगीता चांदगुडे या सोशल मीडियावर व्हिडीओ बनवत असल्याची माहिती आहे. त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरील एका जुन्या व्हिडीओमध्ये त्यांनी कौटुंबिक वाद आणि नणंदेबाबत काही गंभीर आरोप केले होते. या व्हिडीओमध्ये कोणाचंही नाव घेण्यात आलेलं नाही, त्यामुळे हे आरोप नेमके कोणाबाबत होते, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. (Khavdya Dongar Case)
‘भावाच्या संसारात आग लावायची’
व्हिडीओमध्ये संगीता यांनी असा दावा केला होता की, काही बहिणी आपल्या भावाच्या संसारात हस्तक्षेप करतात, भावाच्या मुलांना शिवीगाळ करतात आणि भाऊ-भावजयमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतात. तसेच संसार मोडला नाही तर संपत्तीमध्ये हिस्सा मागण्याचा प्रयत्न केला जातो, असा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. (Khavdya Dongar Case)
‘माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर सण करून खाल्ले’
या व्हिडीओमध्ये संगीता यांनी आपल्या मुलाच्या मृत्यूचाही उल्लेख केल्याचं दिसत आहे. “माझा मुलगा गेल्यानंतर त्यांनी सण करून खाल्ले, पार्टी केल्या,” असा दावा त्यांनी केला होता. (Khavdya Dongar Case)
तसंच, आपण कोणतीही चूक केली नसताना आपल्याला दोषी ठरवलं जात असल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली होती. पतीने आपल्याला साथ दिली नाही, तर आपल्याकडूनही मदतीची अपेक्षा करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. (Khavdya Dongar Case)
‘तुम्हाला तुमच्या कर्माची फळं मिळाली’
संगीता यांनी संबंधित व्यक्तींना उद्देशून, भावाच्या दुःखाच्या काळात त्याला साथ न देणे, भावजयला त्रास देणे आणि संपत्तीच्या कारणावरून वाद निर्माण करणे असे आरोप केले होते. “तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भेटली,” अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. (Khavdya Dongar Case)
व्हिडीओमुळे अनेक प्रश्न उपस्थित
खवड्या डोंगरावरील घटनेनंतर समोर आलेल्या या जुन्या व्हिडीओमुळे चांदगुडे कुटुंबात पूर्वीपासून कौटुंबिक वाद होते का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र, या व्हिडीओतील आरोप आणि खवड्या डोंगरावरील घटनेचा थेट संबंध असल्याचं अद्याप सिद्ध झालेलं नाही. (Khavdya Dongar Case)
कुणालने टोकाचं पाऊल का उचललं, त्यामागे नेमकी कोणती कौटुंबिक किंवा अन्य परिस्थिती होती, याचा तपास पोलीस करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागचं खरं कारण स्पष्ट होणार आहे. (Khavdya Dongar Case)






