Khavdya Dongar Case : खवड्या डोंगर प्रकरणात नवा ट्विस्ट ! आई संगीता हीचा ‘तो’ व्हिडिओ समोर
छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून एकाच कुटुंबातील तिघांचा (Khavdya Dongar Case) मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना नुकतीच समोर आली आहे.

Khavdya Dongar Case : छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावरून एकाच कुटुंबातील तिघांचा (Khavdya Dongar Case) मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना नुकतीच समोर आली आहे.
मुलाचा जीव वाचवण्याच्या (Khavdya Dongar Case) प्रयत्नात संपूर्ण कुटुंबाने एकाच वेळी जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, वरवर एका अपघातासारखी वाटणाऱ्या या घटनेमागे एक अत्यंत गूढ आणि धक्कादायक कौटुंबिक कलह दडल्याचे आता उघडकीस येत आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धनगर पिंपळगावचे मूळ रहिवासी असलेले मुरलीधर चांदगुडे यांनी कुटुंबाच्या मर्जीविरोधात जाऊन संगीता यांच्याशी विवाह केला होता. त्यानंतर ते संभाजीनगरमध्ये स्थायिक झाले आणि ट्रक चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले.
संसार सुरू झाला तरी सासरच्या मंडळींचा त्यांच्या नात्याला विरोध कायम होता. मुरलीधर यांनी पत्नी आणि मुलासोबत स्वतंत्र राहणे त्यांच्या घरच्यांना मुळीच मान्य नव्हते. या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट संगीता यांच्या सोशल मीडिया अकाऊंटमुळे आला आहे.
संगीता या यूट्यूबवर सक्रिय होत्या आणि त्यांनी कौटुंबिक वादांवर अनेक व्हिडिओ बनवले होते. त्यातील एका व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या नणंदेवर थेट आणि गंभीर आरोप केले होते.
“आज तुम्हाला स्वतःच्या मुलापेक्षा ती बहीण महत्त्वाची वाटली, जिने कधी साधी विचारपूसही (Khavdya Dongar Case) केली नाही. त्या बहिणीसाठी तुम्ही आज माझ्या मुलावर हात उचलला, पण लिहून ठेवा… ती बहीण तुम्हाला एके दिवशी कुठेच ठेवणार नाही,” असे संगीता यांनी उद्विग्न होऊन म्हटले होते.
या व्हिडिओवरून असे स्पष्ट होते की, नणंदेच्या सातत्यपूर्ण हस्तक्षेपावरून पती-पत्नीमध्ये टोकाचे वाद होत होते. बहिणीच्या चिथावणीवरून मुरलीधर हे पत्नी संगीता आणि मुलगा कुणाल यांच्यावर हात उचलत असल्याचेही समोर येत आहे.
अखेर कुणालने डोंगरमाथ्यावरून उडी घेण्यासारखे टोकाचे पाऊल (Khavdya Dongar Case) नेमके का उचलले? आणि त्यामागे घरातील सततचा जाच कारणीभूत होता का? या सर्व दिशांनी पोलीस सध्या कसून तपास करत आहेत.






