Khalapur Irshalgad Landslide : मुख्यमंत्र्यांची धक्कादायक कबुली म्हणाले,’दरडग्रस्तांच्या यादीतच ‘या’ गावाचं नाव नव्हतं’

रायगड – खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची दुःखद घटना समोर आली आहे. तसेच परिसरात अनेक लोक अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणी एनडीआरएफ २ पथके पोहचली आहेत. गावात जाण्यासाठी रस्ता नाही. सुमारे १७ घरावर दरड कोसळली आहे. या परिसरात आणखी दोन पथके पोहोचतील. गावात जाण्यासाठी पायवाट असल्याने मदत साहित्य पोहचण्यास उशीर होत आहे. आणखी दोन पथके पोहचत आहेत.
खालापूर (जि. रायगड) येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री @mieknathshinde हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेत आहेत.
प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी… pic.twitter.com/ipXze5yOZu
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 20, 2023
दरम्यान, दरड कोसळल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वनही केले. यानंतर या संपूर्ण घटनेबाबत शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की,’या दुर्घटनेत चारजण जखमी झाले आहेत. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. पण पावसामुळे अडथळे येत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ आणि स्थानिक लोकांच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन करण्यात येत आहे.
ते पुढे म्हणाले, 34 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून बचाव कार्य सुरु आहे. या दरडीखाली 50 ते 60 घरे दबल्याचं सांगितलं जात आहे. तसेच तब्बल 100 लोक या दरडीखाली दबल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे गाव दोन डोंगरांच्यामध्ये आहे. तरीही या गावाचा दरडप्रवण गावांच्या यादीत समावेश करण्यात आले नसल्याचे उघड झालं आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, प्रचंड पाऊस आणि अवघड रस्ता यामुळे बचाव कार्य कार्यात अडथळा येत असला तरी हवामानात सुधारणा झाल्यानंतर तात्काळ हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येईल. सर्व यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत. एनडीआरएफ पथकांकडून बचाव कार्य सुरू आहे. रस्ता नसला तरी मदतकार्य सुरू असून आत्ताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेची माहिती घेतली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.





