खडकवासला विधानसभा मतदारसंघ: श्री तुकाई देवीच्या दर्शनाने आमदार भिमराव तापकीर यांच्या प्रचाराला सुरुवात

पुणे – शिवगंगा खोऱ्यातील श्री तुकाई देवी मंदिर, कोंढणपूर येथे श्रीफळ वाढवून खडकवासला मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे उमेदवार आमदार भिमराव (अण्णा) तापकीर यांच्या प्रचार व पदयात्रेची सुरुवात झाली. या प्रसंगी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदयात्रेला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला.
यावेळी महायुतीतील माजी नगरसेवक दिलीप बराटे, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, खडकवासला शिवसेना अध्यक्ष सतीश घाटे, माजी नगरसेवक प्रदीप (बाबा) धुमाळ, राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, बाळासाहेब नवले, राष्ट्रवादी काँग्रेस खडकवासला अध्यक्ष राजेंद्र पवार, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष अरूण राजवाडे, खडकवासला भाजपा अध्यक्ष सचिन मोरे, माजी नगरसेविका वर्षा तापकीर, राजश्री नवले, राणी भोसले, अश्विनी भागवत, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री भुमकर, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव, नवनाथ तागुंदे, सचिन बदक, यांसह महायुतीचे वरिष्ठ पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
आमदार तापकीर यांनी खडकवासला मतदारसंघातील ग्रामीण भागातून प्रचाराची सुरुवात करून ग्रामीण मतदारांचा चौथ्यांदा विश्वास संपादन करण्याचे उद्दिष्ट ठेऊन नागरिकांना महायुतीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. मागील निवडणुकीत ग्रामीण भागातून मिळालेल्या लीडमुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक दुणावला असून, गेल्या १३ वर्षांत केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांनी यावेळीही महायुतीसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपा-शिवसेना आणि महायुतीच्या सरकारने राज्याच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण कामे केली आहेत, असे आमदार तापकीर यांनी सांगितले.
कोंढणपूर, कल्याण, सिंहगड, रहाटवडे, आर्वी, शिवापुर, खेड शिवापुर, श्रीराम नगर, गाउडदरा, गोगलवाडी यांसारख्या गावांना भेट देऊन त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला आणि आगामी निवडणुकीत महायुतीला पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी जनतेला आवाहन केले.
आमदार भिमराव अण्णा तापकीर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या प्रचार मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचा अभूतपूर्व पाठिंबा पाहता, खडकवासला मतदारसंघात महायुतीसाठी निर्माण झालेले सकारात्मक वातावरण जाणवत आहे.






