रॉकी भाईने रावणाचा रोल नाकारला ! ‘या’ कारणामुळे सोडला बिग बजेट ‘रामायण’ सिनेमा

मुंबई – केजीएफ स्टार यशने आपल्या जबरदस्त अभिनयाने केवळ बॉलिवूडलाच नाही तर हॉलिवूडला देखील वेड लागले आहे. त्यामुळे यशकडे चित्रपटांची लाईन लागलेली आहे. अशात यश सध्या निवडक चित्रपटांमध्येचं काम करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे समजते. नुकतंच यशने रणवीर आलीया स्टारर चित्रपटात निगेटिव्ह पात्र करण्यास नकार दिल्याचे समजते.
नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नितेश तिवारीने ‘केजीएफ’च्या रॉकी भाईला ‘रामायण’ चित्रपटातील ‘रावनाची भूमिका ऑफर केली होती तशा बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र रॉकी भाईने या चित्रपटात रावणाची भूमिका साकारण्यास नकार दिला आहे.या नकाराचे कारण देखील समोर आले आहे.
एका इंग्रजी मीडिया हाऊसने दिलेल्या वृत्तानुसार यशला त्याच्या चाहत्यांना निराश करायचे नाही. केजीएफ नंतर त्याच्या चाहत्यांना त्याला फक्त हिरो म्हणून पहायला आवडते, त्यामुळे कदाचित लोक त्याला खलनायकाच्या भूमिकेत स्वीकारू शकणार नाहीत म्हणून त्याने ही भूमिका नाकारल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
नितेश तिवारीचा ‘रामायण’ हा मेगा बजेट चित्रपट असणार आहे. यामध्ये रणबीर कपूर रामच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सीतेच्या भूमिकेसाठी आलिया भट्ट दिसणार असल्याचे बोलले जात आहे.अशात आता रावणाची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.





