‘रामायण’मध्ये KGF स्टार यशची एन्ट्री; साकारणार महत्त्वाची भूमिका

Ramayana Film | दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहूचर्चित ‘रामायण’ सिनेमात अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री साई पल्लवी सीतामातेच्या भूमिकेत दिसणार आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटातील एक मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात रावणाची भूमिका केजीएफ स्टार यश साकारणार असल्याचे निश्चित झाले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने हे स्पष्ट केले आहे.
‘रामायण’ चित्रपटाबाबत बोलताना यश म्हणाला, “मी खूप उत्साहित आहे. रावणाची भूमिका अतिशय खोल आणि गुंतागुंतीची आहे. म्हणूनच मी याकडे प्रभावित झालो आणि भूमिका स्वीकारली. ही माझ्या करिअरमधील सर्वात बेस्ट भूमिका असेल,” असे म्हणत अभिनेता यशने या चर्चांना पूर्णविराम देत रामायण चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
यावेळी त्याने ‘केजीएफ 3’ चित्रपटही नक्कीच बनणार असल्याचे चाहत्यांना वचन दिले आहे. दरम्यान, रणबीर, साई पल्लवीसह सनी देओल, विजय सेतुपती, लारा दत्ता, अजिंक्य देव या कलाकारांची देखील रामायण सिनेमात एन्ट्री झाली आहे. दरम्यान, साई पल्लवीच्या आधी आलिया भट्ट सीतेची भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या पण त्यानंतर सईला संधी मिळाली.
हेही वाचा:





