रॉकी भाई उर्फ अभिनेता यशचा ‘टॉक्सिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Rocky Bhai – ‘KGF’ आणि ‘KGF 2’ चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धमाका करणारा रॉकी भाई उर्फ अभिनेता यश, सर्वात आवडता पॅन इंडियाचा सुपरस्टार बनला आहे. यशचे चाहते त्याच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशात यशने चाहत्यांना आज सोशल मीडियावर येत्या चित्रपटाचा टिझर शेअर करत गिफ्ट दिल आहे, आज स्वत: यशने त्याच्या पुढच्या चित्रपटाचे नाव जाहीर केले आहे. त्याने सोशल मीडियावर एक टीझर रिलीज केला आहे आणि या चित्रपटाचे टायटल चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
अभिनेता यशने आज त्याच्या आगामी चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर रिलीज केला आहे. यामध्ये त्याने आपल्या आगामी चित्रपटाचे नाव ‘टॉक्सिक’ असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटाची निर्मिती मल्याळम चित्रपट निर्माते गीतू मोहनदास करत असून, ते या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. अभिनेत्याच्या आगामी चित्रपटाच्या या मोठ्या अपडेटने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
यशच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, ‘यश 19’ बॉक्स ऑफिसवर धमाल करणारा हा कन्नड सुपरस्टार अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याने दिग्दर्शक प्रशांत नीलसोबतच्या त्याच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘KGF’ची तिसरी फ्रँचायझीही लवकरच रिलीज होणार असून त्यात तो पुन्हा एकदा अॅक्शन करताना दिसणार आहे. मात्र, सध्या हा चित्रपट बनण्यास वेळ लागणार आहे.





