Ketan Agarwal Case : अग्रवाल केतन प्रकरणात नवा ट्विस्ट! केतनच्या बहिणीचं अन् सियाच्या भावाचं… डबल वेडिंगचा धक्कादायक खुलासा
Ketan Agarwal Case : पुण्यातील प्रसिद्ध केतन अग्रवाल हत्याकांडाला आता एक वेगळंच वळण मिळालं आहे.

Ketan Agarwal Case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासात आता आणखी एक धक्कादायक अँगल समोर आला आहे. केतन अग्रवालचे लग्न सिया गोयलसोबत तर केतनच्या बहिणीचे लग्न सियाचा भाऊ साहिल गोयल याच्यासोबत ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या ‘डबल वेडिंग’मुळे दोन्ही कुटुंबांमध्ये अधिक घट्ट नातं निर्माण होणार होतं. (Ketan Agarwal Case)
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी बाली येथे प्री-वेडिंग शूटचे नियोजन करण्यात आले होते. या शूटमध्ये केतन-सिया यांच्यासोबत साहिल गोयल आणि केतनची बहीणही सहभागी होणार होते. नोव्हेंबर महिन्यात दोन्ही विवाह पार पडणार असल्याची तयारी सुरू होती. (Ketan Agarwal Case)
साहिलच्या भूमिकेचीही चौकशी
या प्रकरणात आता सियाचा भाऊ साहिल गोयल याच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे. सिया आणि चेतन चौधरी यांच्यातील संबंधांची माहिती साहिलला आधीपासून होती का? तसेच त्याने ही बाब कुटुंबापासून लपवली होती का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. (Ketan Agarwal Case)
एका स्थानिक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत साहिलने दावा केला की, सियाने त्याला चेतनसोबतचे संबंध पूर्णपणे संपल्याचे शपथपूर्वक सांगितले होते. तिने केतनशीच लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे आपण आई-वडिलांना याबाबत काही सांगितले नाही, असेही त्याने स्पष्ट केले. (Ketan Agarwal Case)
साहिलच्या म्हणण्यानुसार, सिया केतनसोबतच्या लग्नाबाबत आनंदी होती आणि प्री-वेडिंग शूटची तयारीही सुरू होती. चेतन हा केवळ जुना मित्र असल्याचे आपण समजत होतो, त्यामुळे कोणताही संशय आला नाही, असा दावाही त्याने केला आहे. (Ketan Agarwal Case)
लोहगडावर पोलिसांकडून घटनाक्रमाचे पुनर्निर्माण
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर संपूर्ण घटनाक्रमाचे पुनर्निर्माण (Recreation) केले. तपासादरम्यान केतनच्या उंची आणि वजनाएवढा फायबरचा डमी सुमारे ३०० फूट खोल दरीत फेकून घटनास्थळावरील परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला. (Ketan Agarwal Case)
पोलिसांच्या तपासानुसार, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अग्रवालला दरीत ढकलल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, नव्याने समोर आलेल्या ‘क्रॉस मॅरेज’च्या अँगलमुळे तपासाला आणखी वेग आला आहे. (Ketan Agarwal Case)
Ketan Agarwal Case : अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; केतनला ढकलण्याधी सियाने चेतनला 1 कोटी दिले
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; सियाचा भाऊच निघाला चेतनचा…






