Kesariwada Ganpati : मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती मिरवणुकीला सुरुवात ; “मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा संदेश”
Kesariwada Ganpati : पुण्यातील मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला आहे.

Kesariwada Ganpati : पुण्यातील मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाला आहे. पारंपरिक पद्धतीने आणि ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. यंदा केसरीवाडा गणपती मंडळाने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणारा सामाजिक संदेश दिला आहे.
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि त्याचा शेतीवर होणारा परिणाम या देखाव्यातून मांडण्यात आला आहे. यामध्ये विविध पालेभाज्या, कडधान्ये, धान्य, ऊस आणि फळभाज्यांचा समावेश करण्यात आला आहे. शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसमोरील अडचणींकडे नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.
केसरीवाडा गणपतीच्या मिरवणुकीत हा सामाजिक संदेश पाहण्यासाठीही नागरिकांची उत्सुकता दिसून येत आहे. ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात मिरवणूक पुढे सरकत आहे.
अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या मध्यवर्ती भागात विसर्जन मिरवणुकांची लगबग सुरू असून, प्रमुख मार्गांवर पोलिसांचा बंदोबस्त आणि वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.





