सावधान ! पुढील दोन दिवस केरळला तुफानी पावसाचा इशारा, हवामानशास्त्र म्हणतात….
Updated On:

Kerala Monsoon – भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन दिवसांत केरळ मध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून त्यांनी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये १९ आणि २० मे रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. राज्यातील पथनामथिट्टा, कोट्टायम आणि इडुक्की या दोन जिल्ह्यांसाठी हा रेड ॲलर्ट आहे.
त्याव्यतिरिक्त, तिरुवनंतपुरम, कोल्लम, अलाप्पुझा आणि एर्नाकुलम या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. हवामान विभागाने २१ मे साठी नऊ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
त्यापैकी काही भागात रेड अलर्ट प्रमाणेच पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. या ईशाऱ्यानुसार प्रशासनाने नागरीकांनाही सावधगिरीचा इशारा जारी केला असून प्रशासनाने मदत पथकांनाही सज्ज राहण्याची सुचना केली आहे.





