Kerala Election : रमेश चेन्निथला पुन्हा केरळमधून मैदानात; कॉंग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर
कॉंग्रेसने केरळ विधानसभा निवडणुकीसाठी (Kerala Election) ५५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

Kerala Election : कॉंग्रेसने केरळ विधानसभा निवडणुकीसाठी (Kerala Election) ५५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामुळे रमेश चेन्निथला, सन्नी जोसेफ, व्ही.डी.सतीशन हे पक्षाचे ज्येष्ठ नेते पुन्हा निवडणूक मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत.
डाव्या पक्षांच्या आघाडीची सत्ता असणाऱ्या केरळमध्ये विधानसभेच्या एकूण १४० जागा आहेत.
विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करणारा कॉंग्रेस पक्ष ९२ जागा लढवणार आहे. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक जागांवरील उमेदवार पक्षाने जाहीर केले. त्यामध्ये १९ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. ज्येष्ठ नेत्यांबरोबरच नव्या चेहऱ्यांनाही रिंगणात उतरवण्यात आले आहे.
कॉंग्रेसला सत्ता मिळाल्यास संभाव्य मुख्यमंत्री म्हणून काही ज्येष्ठ नेत्यांकडे पाहिले जाते. त्यामध्ये चेन्निथला यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या आणि इतर काही ज्येष्ठ नेत्यांच्या उमेदवारीला महत्व आहे. माजी मुख्यमंत्री के.करूणाकरन यांचे पुत्र के.मुरलीधरन आणि माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचे पुत्र चांडी ओमन यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
पहिल्या यादीत काही महिला उमेदवारांचाही समावेश आहे. केरळ निवडणुकीसाठी ९ एप्रिलला मतदान होईल. त्या राज्यात डाव्या पक्षांची आघाडी आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीतच कॉंटे की टक्कर होण्याचा अंदाज आहे.






