सायकलवर केली अष्टविनायक वारी

लोणी काळभोर  -पूर्व हवेलीतील सात युवकांनी गणेशोत्सव काळात चार दिवसांत सायकलवर अष्टविनायक वारी करण्याचा संकल्प पूर्ण केला आहे.

यामध्ये वेदांत काळभोर, तनिष्क काळभोर (लोणी काळभोर), स्वप्नील हरगुडे, अभिषेक गाडे, करण गाडे (वाघोली), विक्रम कदम (हडपसर) व निखील निकम (चंदननगर) या सात जणांचा समावेश होता. 

बुधवारी (दि. 15) पहाटे थेऊर येथील चिंतामणीचे दर्शन घेऊन यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड, पाली येथे शनिवारी (दि. 18)

सप्टेंबर रोजी गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन युवकांची अष्टविनायक यात्रा झाली. नागरिकांनी स्वास्थ्य बळकट राहण्यासाठी आठवड्यातून एक दिवस सायकल चालवावी, असे आवाहन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.