केजरीवाल म्हणाले,’आम्हाला चिरडण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही, पंतप्रधान मोदींनी आमचा…’

Arvind Kejriwal । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज आज सकाळी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात जाऊन प्रभूची पूजा केली. त्यानंतर त्यांनी नवग्रह मंदिर आणि शनी मंदिरात जाऊन मोहरीचे तेल अर्पण करून दिवा लावला. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल आता आम आदमी पार्टीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यासाठी रवाना झाले आहेत.
या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील त्यांच्यासोबत होते. त्यांच्या दर्शन-पूजेच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हनुमान मंदिरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिराभोवती कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.
पत्रकार परिषदेदरम्यान हजारो समर्थक आणि कार्यकर्त्यांनी आगमन केल्याने आम आदमी पक्षाच्या कार्यालयात गर्दी झाली. हे पाहून पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, ही पत्रकार परिषद नसून रॅली बनली आहे.
माध्यमांशी बोलतांना भगवंत मान पुढे म्हणाले की, ‘अरविंद केजरीवाल ही एक व्यक्ती नसून एक कल्पना आहे. जर तुम्ही त्या व्यक्तीला अटक केली, मात्र तुम्ही विचार करण्यापासून कसे थांबवाल? भाजपवर टीका करताना ते म्हणाले, “यावेळी 400 चा आकडा ओलांडणार नाही, पण यावेळी भाजपचा कमी मतदान जिंकून येणार आहे.’
विरोधी नेत्यांना सामावून घेऊन तुम्हाला जिंकायचे आहे, असे ते म्हणाले. पण जनतेला सत्य माहीत आहे. मतदानापर्यंत 12 तासांऐवजी 18 तास काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. 4 जून रोजी आम आदमी पक्षाशिवाय केंद्रात सरकार स्थापन होणार नाही, असे ते म्हणाले.





