‘डोसा’ हाक मारताच कीर्ती सुरेश पापाराझींवर संतापली

Keerthy Suresh | दक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश सध्या प्रसिद्धीच्या झोतात आहे. अलीकडेच तिने वरूण धवणच्या ‘बेबी जॉन’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. सध्या कीर्तीचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती पापाराझींवर चिडलेली दिसली. तिला ‘डोसा’ अशी हाक मारल्याने ती चिडली होती.
कीर्ती सुरेश मुंबईत चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आली होती. तिने यावेळी स्लीव्हलेस डेनिम ड्रेस परिधान केला होता. यावेळी पापाराझींनी कीर्तीला ‘क्रिती’ असे म्हणायला सुरुवात केली, ज्यामुळे अभिनेत्री नाराज झाली. तेव्हा तिने स्पष्ट सांगितले की, तिचे नाव क्रिती नसून ‘कीर्ती’ आहे असे अभिनेत्रीने स्पष्ट केले. यानंतर काहीजण तिला ‘डोसा’ अशीही हाक मारली. Keerthy Suresh |
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिला डोसा खूप आवडतो, असा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यावरून पापाराझींनी तिला डोसा हाक मारताच ती काहीशी चिडलेली पाहायला मिळाली. त्यावर ‘किर्ती डोसा नाही, किर्ती सुरेश आहे आणि मला डोसा आवडतो,’ असे म्हणत ती तेथून निघून गेली. Keerthy Suresh |
दरम्यान, कॅलिस दिग्दर्शित ‘बेबी जॉन’ हा बॉलिवूड चित्रपट निर्माता म्हणून ॲटलीचा पहिला चित्रपट आहे. हा सिनेमा थलपथी विजय, सामंथा आणि ॲटली यांच्या ‘थेरी’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 13 कोटींची कमाई केली होती. Keerthy Suresh |
कीर्तीने अलीकडेच १२ डिसेंबर रोजी गोव्यात तिचा बालपणीचा मित्र आणि दीर्घकालीन बॉयफ्रेंड अँटोनी थट्टिलशी लग्न केले. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
हेही वाचा:
चंपाई सोरेन जेएमएममध्ये परतणार? ; एका पोस्टने राजकीय चर्चांना उधाण





