जरा शांत राहा, आज बकरी ईद आहे.! अन् ‘व्हेज’ फूड ब्लॉगरवर स्वरा भास्कर भडकली; नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला सुनावलं

Swara Bhasker | Nalini Unagar : इस्लाम धर्मात ईदचा सण वर्षातून दोनदा साजरा केला जातो. इस्लामिक कॅलेंडरनुसार, ‘रमजान ईद’ ‘शव्वाल’च्या पहिल्या तारखेला, नवव्या महिन्यानंतरच्या 10व्या महिन्यात म्हणजेच ‘माह-ए-रमजान’ला साजरी केली जाते. याला ‘ईद-उल-फित्र’ आणि ‘मेठी ईद’ असेही म्हणतात.
तर दुसऱ्या ईदला ‘ईद-उल-अजहा’ किंवा ‘बकरीद’ म्हणतात. हा 12 व्या महिन्यात ‘माह-ए-झिल्हजा’ साजरा केला जातो. यावेळी बकरीद आज म्हणजेच 17 जून रोजी बकरी ईद साजरी करण्यात येत आहे. मुस्लीम समाजात रमजान आणि बकरी ईद हे मोठे सण म्हणून साजरे केले जातात.
बकरी ईदनिमित्त अनेक कलाकार आणि नेते मंडळी मुस्लिम बांधवाना शुभेच्छा देताना दिसत आहेत. सोशल मीडियावर देखील पोस्ट शेअर करत असतात. मात्र, अश्यातच काही दिवसांपासून अभिनय क्षेत्रापासून दुर असलेली अभिनेत्री ‘स्वरा भास्कर’ची सोशल मीडिया पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
झालं असं की.., आज बकरीदच्या निमित्ताने अभिनेत्रीने आपल्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून शाकाहारी लोकांची खिल्ली उडवली आहे. यासह, तिने ‘मला शाकाहारी असल्याचा अभिमान आहे.’ असं म्हणणाऱ्या एका फूड व्लॉगरला प्रतिक्रिया दिली आहे.
स्वरा भास्करच्या पोस्टमध्ये तिने ‘नलिनी उनगर’ नावाच्या फूड व्लॉगरला रिट्विट केले आहे. आज बकरीदच्या दिवशी नलिनीने तिच्या जेवणाच्या ताटाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये ‘मला शाकाहारी असल्याचा अभिमान आहे. माझे ताट अश्रू, क्रूरता आणि पाप मुक्त आहे…’ असे लिहिले होते.
आता स्वराने ही पोस्ट पुन्हा शेअर केली आणि लिहिले, खरे सांगायचे तर मला शाकाहारी लोकांबद्दल एक गोष्ट समजत नाही. तुमचा संपूर्ण आहार गायींच्या वासरांना त्यांच्या आईच्या दुधापासून दूर नेऊन, गायींना बळजबरीने गर्भधारणा करुन, नंतर त्यांना त्यांच्या बाळांपासून वेगळे करुन आणि मग त्यांचे दूध चोरुन बनवलेला असतो.
Honestly… I don’t understand this smug self righteousness of vegetarians. Your entire diet is made up of denying the calf its mother’s milk.. forcibly impregnating cows then separating them from their babies & stealing their milk. You eat root vegetables? That kills the whole… https://t.co/PqHmXwwBTR
— Swara Bhasker (@ReallySwara) June 16, 2024
तुम्ही मूळ भाज्या खाता का? यातही संपूर्ण वनस्पतीच मारली जाते! जरा शांत राहा, आज बकरी ईद आहे म्हणून अशा गोष्टी बोलू नका!’ स्वराच्या या पोस्टमुळे एक्स प्लॅटफॉर्मवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. युजर्स तिला ट्रोल करत आहेत.
स्वरा भास्करने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात माधोलाल कीप वॉकिंगमधून केली होती. या चित्रपटात ती सहाय्यक भूमिकेत दिसली होती. त्यानंतर स्वरा तनू वेड्स मनू, रांझना, प्रेम रत्न धन पायो, वीरे दी वेडिंग यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. याशिवाय स्वरा राजकारणात देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.





