Jackson Warne Claim : शेन वॉर्नच्या मृत्यूला कोविड लस जबाबदार? निधनाच्या ४ वर्षांनंतर मुलाचा खळबळजनक दावा
Jackson Warne Claim : शेन वॉर्न यांचे २०२२ मध्ये वयाच्या ५२ व्या वर्षी थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. या घटनेने संपूर्ण क्रिकेट विश्व हादरले होते.

Jackson Warne Claim Shane Warne Death COVID Vaccine Controversy : विश्वविख्यात फिरकीपटू शेन वॉर्न यांच्या निधनाला चार वर्षे उलटल्यानंतर, त्यांचा मुलगा जॅक्सन वॉर्न याने केलेल्या एका खळबळजनक विधानाने जगभरात चर्चेला उधाण आले आहे. वडिलांच्या मृत्यूला कोविड-१९ ची लस जबाबदार असावी, असा थेट संशय जॅक्सनने व्यक्त केला आहे. Jackson Warne Claim
ऑस्ट्रेलियाचे महान फिरकीपटू शेन वॉर्न यांचे २०२२ मध्ये वयाच्या ५२ व्या वर्षी थायलंडमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. या घटनेने संपूर्ण क्रिकेट विश्व हादरले होते. आता त्यांचे सुपुत्र जॅक्सन वॉर्न याने एका पॉडकास्टमध्ये बोलताना वडिलांच्या मृत्यूबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. “वडिलांचा मृत्यू बहुधा कोविडच्या त्या ३-४ लसींमुळे झाला असावा, ज्या त्यांना कामाच्या सक्तीमुळे घ्याव्या लागल्या होत्या,” असे जॅक्सनने ‘२ वर्ल्ड्स कोलाईड’ पॉडकास्टवर म्हटले. Jackson Warne Claim
“मी सरकारला दोषी धरले” (Jackson Warne Claim)
Jackson, the son of Shane Warne speaks out about the cricket legend’s untimely death.
He blames
The government and believes his death was connected to the Covid vaccine !!Also confirming Shane had taken a booster prior to that fateful trip to Thailand.
Legacy media did… pic.twitter.com/qdJjSwxgqW
— Kat A 🌸 (@SaiKate108) April 13, 2026
वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतरची आपली पहिली प्रतिक्रिया सांगताना जॅक्सन भावूक झाला होता. तो म्हणाला, “फोन खाली ठेवल्याबरोबर माझी पहिली प्रतिक्रिया हीच होती की, मी यासाठी सरकारला दोषी धरले. मला खात्री आहे की लसीमुळे त्यांच्या आरोग्याच्या समस्या बळावल्या. वडिलांना आधीपासून काही किरकोळ त्रास होता, पण लस घेतल्याने आजार वेगाने उघडपणे समोर आला असावा.”
हेही वाचा – IPL 2026 : हैदराबादला मोठा झटका! ‘हा’ खेळाडू स्पर्धेतून बाहेर
लस घेण्याची नव्हती इच्छा
जॅक्सनने पुढे स्पष्ट केले की, शेन वॉर्न यांना स्वतःहून लस घेण्याची अजिबात इच्छा नव्हती. परंतु, जगभरात प्रवास करणे आणि आपले काम सुरू ठेवण्यासाठी इतर लोकांप्रमाणेच त्यांना लस घेण्याची सक्ती करण्यात आली होती. “त्यांनी ३ किंवा ४ डोस घेतले असावेत. याबद्दल विचार केला की मला खूप राग येतो, कारण ते पूर्णपणे ठीक होते,” अशा शब्दांत जॅक्सनने आपली नाराजी व्यक्त केली. या विधानामुळे आता वैद्यकीय क्षेत्रात आणि सोशल मीडियावर पुन्हा एकदा कोविड लसीच्या परिणामांबाबत चर्चा सुरू झाली आहे. (Jackson Warne Claim)





