कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव पुण्यातील राहत्या घरी दाखल; मित्रपरिवाराकडून हळहळ व्यक्त

Pahalgam Terror Attack | काश्मीरच्या पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २७ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. त्यापैकी पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह गुरुवारी पहाटेच्या सुमारास पुण्यात आणण्यात आले आहे. यानंतर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे मृतदेह त्यांच्या घरी नेण्यात आले असून अनेकांची मोठी गर्दी जमली आहे.
कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्यांना अश्रू अनावर झाले आहेत. कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबीयांचा फसरणाचा व्यवसाय होता. त्यामुळे हे कुटुंब या परिसरात प्रसिद्ध आहे. कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून मित्र होते. त्यामुळे हे दोन्ही कुटुंबीय एकत्रच काश्मीर फिरायला गेले होते. मात्र, या दोन्ही कुटुंबातील पुरुषांना दहशतवादी हल्ल्यात जीव गमावावा लागला.
कौस्तुभ गणबोटेंच्या घरी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली आहे. यावेळी त्यांचा मित्रपरिवार देखील भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. पहलगाममध्ये केलेल्या या हल्ल्यात दहशतवाद्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी त्यांच्या मित्रपरिवारीकडून केली जात आहे. Pahalgam Terror Attack |
साधारण ९:३० वाजण्याच्या दरम्यान गणबोटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणावरती फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे. Pahalgam Terror Attack |
हेही वाचा:
“आम्ही सनातनी तडपवून मारणार, ५६ इंचांची छाती….” ; निशिकांत दुबेंचे मोठे विधान





