Katrina Kaif | अभिनेत्री कतरिना कैफच्या गरोदरपणाची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. लवकरच कतरिना आणि विकी कौशल आई-बाबा होणार असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र याबाबत दोघांनी अद्याप कोणतीही अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही. याच चर्चांदरम्यान आता कतरिनाचा एक फोटो व्हायरल होत असून, ज्यात कतरिनाचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कतरिना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कार्यक्रमात दिसलेली नाही. अलीकडेच आर्यन खानच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या मालिकेच्या प्रीमियरला विकी हजर होता, मात्र त्याच्यासोबत कतरिना पोहोचली नव्हती, ज्यामुळे अभिनेत्रीच्या गरोदरपणाच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे. यानंतर आता कतरिनाचा बेबी बंप असलेला फोटो समोर आला आहे. कतरिनाचा हा बेबी बंप दिसणारा फोटो रेडिटवर शेअर करण्यात आला आहे. या फोटोत कतरिना एका शूटमध्ये दिसत आहे आणि तिचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. या फोटोवर चाहते तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत. Katrina Kaif | गरोदर असल्याच्या चर्चांना सुरुवात एक चाहता म्हणाला, “मी कतरिनासाठी खूप खुश आहे.” तर दुसरा म्हणाला, “खूप-खूप अभिनंदन, मी खूप आनंदी आहे.” याआधीही कतरिना आणि विकी यांना एकत्र पाहिलं गेलं होतं, तेव्हा कतरिना लूज कपड्यांमध्ये होती. तसेच तिच्या चालण्याची पद्धत देखील वेगळी होती, ज्यामुळे ती गरोदर असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली होती. Katrina Kaif | प्रोफेशनल फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर कतरिना 2024 मध्ये आलेल्या ‘ख्रिसमस’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तिने कोणत्याही नव्या चित्रपटाची घोषणा केली नाही किंवा कोणत्याही प्रोजेक्टमध्ये दिसली नाही. हेही वाचा : “मी ब्राह्मण जातीचा, परमेश्वराचे मोठे उपकार…”; आरक्षणाच्या मुद्यावर नितीन गडकरी स्पष्टच बोलले