कतरिना कैफ गरोदर असल्याच्या रंगल्या चर्चा; विकी कौशलसोबतचा व्हिडीओ व्हायरल

Katrina Kaif | अभिनेता विकी कौशल आणि त्याची पत्नी कतरिना कैफ यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमधील कतरिनाच्या कपड्यांमधला लूक पाहून ती गरोदर असल्याच्या चर्चा पुन्हा रंगल्या आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये विकी आणि कतरिना एकत्र दिसत आहेत. यावेळी दोघेही मुंबईहून अलिबागला जात होते. कतरिनाने पांढरा शर्ट आणि पँट घातली होती, तर विकी कॅज्युअल लूकमध्ये दिसत होता. दोघांचेही चेहरे मास्कने झाकलेले होते. मात्र कतरिनाच्या ओव्हरसाइज पांढऱ्या शर्टने इंटरनेटचे लक्ष वेधले असून ती गर्भवती असल्याची अटकळ बांधली जात आहेत.
View this post on Instagram
याशिवाय लोक तिच्या चालण्याच्या स्टाइलवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. एका युजरने कमेंट केली, ‘कॅट गर्भवती दिसते.’ तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले, ‘मी प्रार्थना करतो की आपल्याला लवकरच चांगली बातमी मिळेल, तिचे कपडे आणि चालण्याची पद्धत थोडी वेगळी वाटते.’ Katrina Kaif |
मात्र काही वृत्तांमध्ये हा व्हिडिओ मार्चमध्ये झालेल्या लग्नाच्या रिसेप्शननंतर अलिबाग ट्रिपचा असल्याचा देखील म्हंटले जात आहे. दरम्यान, डिसेंबर 2021 मध्ये विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नानंतर अनेकदा कतरिनाच्या गरोदरपणाच्या चर्चा रंगल्या आहेत. Katrina Kaif |
हेही वाचा :





