कॅटरिना बनली एतिहाद एअरवेजची ब्रॅंड ऍम्बेसेडर
Updated On:

मुंबई – संयुक्त अरब अमिरातीची राष्ट्रीय विमान कंपनी एतिहाद एअरवेजने मंगळवारी सांगितले की त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफला ब्रॅंड ऍम्बेसेडर म्हणून साइन केले आहे. गेल्या दशकात या विमान कंपनीने कॅटरिनाला ही जबाबदारी देण्याची दुसरी वेळ आहे.
एतिहादची ब्रॅंड ऍम्बेसेडर म्हणून, कतरिनाला क्रिएटिव्ह आणि आकर्षक मोहिमेच्या व्हिडिओंच्या मालिकेत दाखवले जाणार आहे. कॅटरिनामुळे या विमान कंपनीला भारतात अधिक व्यवसाय मिळू शकतो असा कंपनीचा विश्वास आहे.
या विमान कंपनीतर्फे भारतातील आठ शहरांमध्ये विमान सेवा दिली जाते. या जबाबदारीबाबत आपण उत्साही आहोत असे कॅटरिनाने म्हटले आहे. या आधी सन 2010 मध्ये कॅटरिनाने याच विमान कंपनीसाठी ब्रॅंड ऍम्बेसेडर म्हणून काम केले होते.





