‘कटप्पा’ला करोनाचा विळखा; प्रकृती गंभीर रुग्णालयात दाखल
Updated On:

मुंबई – देशभरात करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून, पुन्हा एका देशात चिंतेचे वातावरण निर्मण झाले आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत मध्ये बॉलिवूडसह आता साउथचे अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडेल आहेत.
सुपरस्टार महेश बाबु, मांचू मनोज, मांचू लक्ष्मी, अभिनेता विश्व सेन, अभिनेत्री त्रिशा यांनाही करोनाची लागण झाली आहे. अश्यातच बाहुबली सिनेमात कटप्पाची भूमिका साकारणारे अभिनेते ‘सत्यराज’ यांना सुद्धा करोना विषाणूचा संसर्ग झाला असून, त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सत्यराज गेल्या काही दिवसांपासून करोनावर उपचार घेत आहेत. सुरुवातीला त्यांना होम आयसोलेशनमध्येच ठेवण्यात आलं होतं. मात्र जास्त त्रास होऊ लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सत्यराज यांचे वय सध्या ६७ वर्षे इतके आहे.





