Kashmira Shah : चेहऱ्यावर मोठी पट्टी अन्…. अपघातानंतर असा झाला कश्मिराचा चेहरा; व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली…

Kashmira Shah Health Update । Kashmera Shah : 18 नोव्हेंबर रोजी बॉलिवूड अभिनेत्री कश्मिरा शाहचा भीषण अपघात झाला होता. स्वत: कश्मिराने इनस्टाग्रामवर रक्ताने माखलेल्या कपड्यांचे फोटो शेअर करत ही माहिती दिली. कश्मिराने इनस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली होती.
तिने पोस्टमध्ये लिहिले की, “मला वाचवण्यासाठी देवाचे आभार. खूप भयानक घटना होती. काहीतरी मोठं घडलं असतं. परंतु थोडक्यात निभावलं. जखमेच्या खुणा राहणार नाहीत याची मला आशा आहे. प्रत्येक क्षण जगा. आज मला माझ्या कुटुंबाची खूप आठवण येते.”
अभिनेत्री कश्मिरा शाह हिचा लॉस एंजेलिस येथे मोठा अपघात झाला होता. तिचा पती कृष्णा काही दिवसांपूर्वीच आपल्या दोन्ही मुलांसोबत मुंबईत आला होता. तेव्हाच कश्मिराचा एल ए मध्ये मोठा अपघात झाला. कृष्णा सध्या त्याची मुलं रेयान आणि कृषांग यांच्यासोबत मुंबईत आहे. तर कश्मिरा परदेशात आहे.
दरम्यान, अपघाताच्या काही दिवसांनी अभिनेत्री आणखी एक फोटो शेअर केला होता ज्यात तिच्या चेहऱ्यावर भले मोठे बॅंडेज असल्याचे दिसत आहे. तसेच तिच्या शेजारी एक डॉक्टर उभे असल्याचं त्या फोटोमध्ये दिसतं होत.
View this post on Instagram
आता तिने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिच्या नाकावर जखम दिसत आहे. आणि नाकावर छोटशी एक पट्टी दिसत आहे. कश्मीराने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे आभार मानले. तसेच तिने तिच्या प्रकृतीबद्दलही माहिती दिली आहे.
व्हिडीओमध्ये कश्मीरा म्हणाली, “आता नाकावर एक लहान पट्टी आहे, मोठी पट्टी काढली आहे. पण आता मी बरी आहे. सर्वांचे आभार. रस्ता ओलांडत आहे, नाहीतर इथेच पडायचे. प्रार्थना केल्यात त्यासाठी सर्वांचे आभार, लव्ह यू.” असं म्हणत तिने सर्वांचे आभार मानले आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कश्मिरा लाफ्टर शेफ शोमध्ये पती कृष्णा अभिषेकसोबत पाहायला मिळते होते. या शोमध्ये कश्मिराने खूप धम्माल करत चाहत्यांचे मनोरंजन केले. या शोमध्ये निया शर्मा, करण कुंद्रा, अर्जुन बिलानी, रीम शेख असे स्टार्स होते. तर कृष्णा सध्या नेटफ्लिक्स शो द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये दिसत आहे.





