आधी हल्ला केला आता भीतीनं कापरं फुटलं ; पाकिस्तानी हवाई दल ‘हायअलर्ट’वर

Kashmir Terror Attack । पहलगाममध्ये दहशहतवाद्यानी पर्यटकांवर भ्याड हल्ला करत निष्पाप २७ जणांचा बळी घेतला. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या संलग्न द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला आता भीतीनं कापरं फुटल्याचे दिसत आहे. कारण पाकने आपल्या हवाई दलाला हाय अलर्टवर ठेवले आहे. पाकिस्तानी हवाई दलाचे गुप्तचर विमान भारतीय सीमेला लागून असलेल्या भागातील हवाई क्षेत्रावर सतत लक्ष ठेवून असल्याची माहिती समोर आली आहे.
या हल्ल्यानंतर पाकिस्तानला भीती आहे की भारत बालाकोट एअरस्ट्राइकसारखा बदला घेऊ शकतो.त्यामुळे पाक च्या सुरक्षा यंत्रणा देखील अर्लट मोडवर गेल्या आहेत. तर दुसरीकडे भारतीय सुरक्षा संस्था देखील सतर्क आहेत आणि सीमावर्ती भागात दक्षता वाढविण्यात आली आहे.
I am sure Islamabad is taking all possible measures to thwart any Indian misadventure against Pakistan. I have no doubt this time Pakistan’s response would be very hard.
— Abdul Basit (@abasitpak1) April 22, 2025
भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बस्त यांनी सोशल मीडियावर ट्विट केले आहे. त्यात त्यांनी,”मला पूर्ण विश्वास आहे की भारताच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला रोखण्यासाठी इस्लामाबाद सर्व आवश्यक पावले उचलत आहे. यावेळी पाकिस्तानची प्रतिक्रिया खूप कठोर असेल.”असा इशाराच त्यांनी दिला आहे.
दहशतवादी हल्ल्यात ८-१० दहशतवादी सहभागी ? Kashmir Terror Attack ।
हलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संशयाची सुई पाकिस्तानकडे वळत असताना हे विधान आले आहे. या दहशतवादी हल्ल्यात ८ ते १० दहशतवादी सहभागी असू शकतात. या घटनेत, स्थानिक मदतनीस असलेले २ ते ३ दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात असू शकतात. हे दहशतवादी पाकिस्तानी दहशतवाद्यांना पहलगाम परिसरात पोहोचण्यास मदत करत होते. स्थानिक भाषेत बोलून या दहशतवाद्यांनी कोणालाही काहीही संशय येऊ दिला नाही. पोलिसांच्या गणवेशातील या दहशतवाद्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना पहलगाम हल्ला घडवून आणलेल्या ठिकाणी पोहोचण्यास मदत केली. याशिवाय ५ ते ७ दहशतवादी पाकिस्तानी वंशाचे असल्याची माहितीही समोर आली आहे.
दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू Kashmir Terror Attack ।
मंगळवारी दक्षिण काश्मीरमधील प्रमुख पर्यटन स्थळ पहलगामवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान २६ जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे – एक संयुक्त अरब अमिरातीचा आणि एक नेपाळचा.





