Kartiki Wari 2021: पंढरपूर कार्तिकी वारीसाठी विशेष रेल्वेचे नियोजन; पाहा वेळापत्रक
Updated On:

पुणे – कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येतात. भाविकांची संख्या लक्षात घेत मध्य रेल्वेकडून पंढरपूरसाठी 12 नोव्हेंबरपासून अनारक्षित रेल्वे सोडण्यात येणार आहे.
पंढरपूर येथे यात्रेसाठी दरवर्षी हजारो भाविक येतात. या अनुषंगाने रेल्वेकडून विशेष रेल्वे सोडण्यात येते. यंदादेखील लातूर-पंढरपूर, पंढरपूर-मिरज आणि लातूर-मिरज या मार्गावर अनारक्षित विशेष रेल्वे धावणार आहेत. लातूर-पंढरपूर-लातूर विशेष रेल्वे 12,15,16,17 नोव्हेंबर, पंढरपूर-मिरज-पंढरपूर विशेष रेल्वे 13, 15, 16 नोव्हेंबर, लातूर-मिरज-लातूर विशेष रेल्वे 12 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे.
या रेल्वेतून जनरल तिकीटावर प्रवास करता येणार आहे. मात्र, जनरल तिकीटासाठी नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.





