Kartik Aaryan : कार्तिक आर्यन ‘बेस्ट अभिनेता’; वाचा पुरस्कार आणि नामांकनांची सविस्तर यादी !

kartik aryan | bhool bhoolaiyya 3 : आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (IIFA) आयफा पुरस्कार २०२५ सोहळा रविवारी जयपूरमध्ये पार पडला. या सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील सर्व कलाकारांनी खास हजेरी लावली होती शनिवारी आयफा डिजिटल पुरस्कारांचे विजेते आणि रविवारी आयफा मुख्य पुरस्कारांचे विजेते जाहीर करण्यात आले.
ज्यामध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना पुरस्कार देण्यात आले. ‘भूल भुलैया ३’ साठी अभिनेता कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर किरण राव दिग्दर्शित ‘लपता लेडीज’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आणि आणखी ४ पुरस्कार मिळाले.
याशिवाय शाहरुख खान, माधुरी दीक्षित, करीना कपूर, शाहिद कपूर आणि कार्तिक आर्यन यासारख्या कलाकारांनीही या पुरस्कार जबरदस्त परफॉर्म केले. त्याच वेळी, कार्तिकने करण जोहरसोबत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले.
रंगमंचावर दिसली बॉलिवूडची जादू !
यावेळी ‘भूल भुलैया’ मध्ये ‘रू बाबा’ च्या अवतारात प्रवेश करून कार्तिकने प्रेक्षकांची मने जिंकली. दरम्यान, करीना कपूरने तिचे आजोबा, बॉलिवूड शोमन राज कपूर यांना त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांवर सादरीकरण करून श्रद्धांजली वाहिली. यादरम्यान शाहिद कपूर, माधुरी दीक्षित, कृती सेनन आणि कार्तिक आर्यन यांचे धमाकेदार नृत्य सादरीकरणही पाहायला मिळाले.
कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
‘भूल भुलैया ३’ मधील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. यावेळी तो म्हणाला, ‘या फ्रँचायझीचा भाग असणे माझ्यासाठी स्वप्नापेक्षा कमी नव्हते. जेव्हा माझी पहिल्यांदा यासाठी निवड झाली तेव्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले होते, पण आज हा पुरस्कार माझ्या प्रवासातील सर्वात मोठी कामगिरी आहे. असं अभिनेता यावेळी म्हणाला.
रवी किशन यांचा पहिला आयफा पुरस्कार !
‘लापता लेडीज’ मधील दमदार अभिनयासाठी रवी किशनला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कार रात्री कोणाला कोणता पुरस्कार मिळाला ते देखील सविस्तर पाहणार आहोत….
पुरस्कारांची सविस्तर यादी :
सर्वोत्कृष्ट चित्रपट – लापता लेडीज
सर्वोत्कृष्ट अभिनेता – कार्तिक आर्यन (भूल भुलैया ३)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – नितांशी गोयल (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – किरण राव (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – रवी किशन (लापता लेडीज)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – जानकी बोडीवाला (शैतान)
सर्वोत्कृष्ट खलनायक – राघव जुयाल (किल)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता – लक्ष्य लालवानी (किल)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री – प्रतिभा रांता (लापता लेडीज)
डिजिटल (OTT) चित्रपट पुरस्कार-
सर्वोत्कृष्ट चित्रपट – अमर सिंह चमकिला
सर्वोत्कृष्ट अभिनेता – विक्रांत मेस्सी (सेक्टर ३६)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कृती सेनन (दो पत्ती)
डिजिटल (OTT) सिरीज पुरस्कार-
सर्वोत्कृष्ट वेब सिरीज – पंचायत ३
सर्वोत्कृष्ट अभिनेता – जितेंद्र कुमार (पंचायत ३)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – श्रेया चौधरी (बँडिश बँडिट्स २)
आयफा अवॉर्ड्स २०२५ ची ही रात्र बॉलिवूड प्रेमींसाठी संस्मरणीय ठरली. राजस्थानच्या सौंदर्यात झालेल्या या भव्य कार्यक्रमाने भारतीय चित्रपटसृष्टीच्या गौरवशाली भविष्याची झलक दाखवली. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होताना दिसत आहे.





