सारा अली खानसोबतच्या नात्याबाबत कार्तिक आर्यनने सोडले मौन म्हणाला,”गेल्या दीड वर्षपासून…”

मुंबई – बॉलिवूडचा हँडसम हंक म्हणून प्रसिद्ध असलेला कार्तिक आर्यन मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहे. ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटादरम्यान सारा अली खानसोबत त्याचे नाव चर्चेत होते. त्यातच, प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने ‘कॉफी विथ करण’च्या या सीझनमध्ये सारा आणि कार्तिकच्या ब्रेकअपला दुजोरा दिला आहे. या प्रकरणावर कार्तिक आर्यनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. त्यानंतर आता कार्तिकने यावर मौन सोडले आहे.
कार्तिक आर्यनने आपल्या ओपन रिलेशनशिपबाबत वक्तव्य केले. कार्तिकने त्याची एक्स गर्लफ्रेंड सारा अली खानबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला. पण या क्षणी तो सिंगल असल्याचे अभिनेत्याने स्पष्टपणे उघड केले. जेव्हा कार्तिकला एका मुलाखतीत विचारण्यात आले की, ‘कॉफी विथ करण’मध्ये दिलेल्या त्याच्या लव्ह लाईफबद्दलची त्याची पूर्वीची विधाने खोटी वाटतात, तेव्हा तो म्हणाला, ‘मी गेल्या दीड वर्षांपासून सिंगल आहे, त्याशिवाय मला काही माहीत नाही..’
कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांनी इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांच्या अफेअरची सर्वत्र चर्चा होती. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.





