Sara Ali Khan : सूत्रसंचालकाचे भर कार्यक्रमात विचित्र वक्तव्य; सारा अली खानचे हावभाव कॅमैऱ्यात कैद, video व्हायरल
Sara Ali Khan : पती पत्नी और वो दो चित्रपटाच्या ट्रेलर लॅान्च कार्यक्रमा दरम्यान एक अनपेक्षित घटना घडली. ज्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Sara Ali Khan : नुकताच अभिनेता आष्युमान खुराना याची मुख्य भूमिका असलेला ‘पती पत्नी और वो दो’ या रोमँटिक कॅामेडी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. हा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून, यावर विविध प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्या आहेत.
“पति पत्नी और वो दो” हा चित्रपट 15 मे 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात एक अनपेक्षित घटना घडली ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ याच ट्रेलर लॉन्च कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालकाने एक विचित्र आणि हास्यास्पद टिप्पणी केल्याने साऱ्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधले.
पापाराझींच्या रील्सबद्दल बोलताना, सूत्रसंचालकाने “मी सर्व सेलिब्रिटींना मागून ओळखू शकतो,” असे विचित्र विधान केले. या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये थोडा गोंधळ निर्माण झाला होता.
सूत्रसंचालकाच्या वक्तव्यावर अभिनेत्री सारा अली खानने तात्काळ प्रतिक्रिया देत तिच्या शेजारी बसलेल्या रकुल प्रीत सिंगला, “तो काय म्हणतोय?” असा प्रश्न विचारला. यावेळी ती गोंधळात पडल्याचे जाणवले. तसेच तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजीचे भाव दिसत होते. हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला असून, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
View this post on Instagram
या कार्यक्रमाला आयुष्मान खुराना, वामिका गब्बी, रकुल प्रीत सिंग आणि सारा अली खान उपस्थित होते.
दरम्यान, मुदस्सर अझीझ दिग्दर्शित हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट 15 मे 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 2019 मध्ये आलेल्या ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाचा हा सिक्वेल असून, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता आहे.






