कार्तिक आर्यनचे 10 वर्षानंतर पूर्ण झाले स्वप्न; इंजिनिअरिंगची पदवी मिळताच व्यक्त केला आनंद

Engineering degree to Karthik Aryan | बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनने अल्पावधीतच सिनेक्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. जगभरात त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. मात्र सध्या तो त्याच्या चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. कार्तिक आर्यनला नवी मुंबईतील डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात पदवी प्रदान करण्यात आली. शनिवारी कार्तिकने आपल्या इन्स्टाग्रामवर या समारंभाचे काही क्षण शेअर केले आहेत.
या व्हिडीओमध्ये कार्तिकचे कॉलेजमधील अनेक क्षण दिसतात. कार्तिकचे कॉलेजमध्ये करण्यात आलेले स्वागत, शिक्षकांशी साधलेला संवाद, कॅम्पसमध्ये फेरफटका अशा जुन्या आठवणींना व्हिडीओद्वारे उजाळा दिला आहे. यावेळी कार्तिकने मंचावर विद्यार्थ्यांबरोबर त्याच्या ‘भूलभुलैया ३’ चित्रपटाच्या गाण्यावरही नृत्य सादर केले.
View this post on Instagram
कार्तिकने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत लिहिले, “बॅकबेंचरपासून मंचावर उभं राहून पदवी स्वीकारण्यापर्यंतचा हा प्रवास खूपच सुंदर आहे. डी. वाय. पाटील कॉलेजने मला खूप आठवणी दिल्या, स्वप्न दिली आणि अखेर माझी पदवीही दिली (त्यासाठी दहा वर्ष लागले). विजय पाटील सर, माझे अद्भुत शिक्षक आणि येथील तरुण स्वप्नवेड्या विद्यार्थ्यांनो, तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद. मला माझ्या घरी परत आल्यासारखं वाटत आहे.” Engineering degree to Karthik Aryan|
कार्तिकने 2011 मध्ये लव रंजनच्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मागील वर्षी कार्तिकच्या ‘चंदू चॅम्पियन’ आणि ‘भूलभुलैया ३’ या चित्रपटांनी चांगली कामगिरी केली. याशिवाय तो ‘आशिकी 3’ मध्येही दिसणार आहे. तसेच कार्तिक करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्सद्वारे निर्मित ‘तू मेरी, मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. Engineering degree to Karthik Aryan |
हेही वाचा:
Deva Film : शाहिद, पूजाची केमेस्ट्री जुळली; कस आहे देवा सिनेमातल ‘भसड मचा’ साँग? तु्म्ही पाहिलतं का?





