हेरा फेरी ३ मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री; परेश रावलांची जागा घेणार? सुनील शेट्टीने दिली महत्वाची माहिती

Hera Phase 3 | Karthik Aryan | ‘हेरा फेरी ३’ चित्रपटामधून अभिनेते परेश रावल यांनी एक्सिट घेतल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनतर या चित्रपटाचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात बॅालीवूडमधील आघाडीच्या कलाकाराची एन्ट्री होणार आहे. याबाबत स्वतः अभिनेता सुनील शुट्टीने झुमसोबत बोलताना खुलासा केला आहे.
झूमने नुकताच अभिनेता सुनील शुट्टीसोबत याविषयी संवाद साधला. मुलाखतीत सुनीलने हेरा फेरी ३ मधून परेश रावलच्या बाहेर पडण्याबाबत सांगितले. एवढेच नव्हे तर त्याने या चित्रपटात एका बॅालीवूड अभिनेत्याची एन्ट्री होणार असल्याचाही खुलासा केला आहे. या चित्रपटात दुसरा तिसरा कोणी नसून बॅालीवूडचा आघाडीचा कलाकार कार्तिक आर्यन याची एन्ट्री होणार असल्याचे सुनील शिट्टीने सांगितले.
सुनीलने सांगितले की, कार्तिकची ‘हेरा फेरी 3’ मध्ये एन्ट्री केली असून, त्याला एका नवीन पात्रासह आणले जाणार आहे. यामुळे या चित्रपटातील मुख्य तीन पात्रांपैकी कोणाचीही जागा कार्तिक घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पुढे तो म्हणाला, ज्याप्रमाणे ‘शोले’मध्ये जय-वीरू बसंती-धन्नोची जागा घेऊ शकत नाहीत, त्याचप्रमाणे या चित्रपटातही पात्रंही बदलता येणार नाहीत. हा चित्रपट लवकरच बनवला जाईल. या चित्रपटाच्या यशाचे संपूर्ण श्रेय त्यातील कलाकारांना नाही, तर त्यातील पात्रांना जाते. कार्तिक कोणाचीही जागा घेणार नाही. त्याला एका नवीन पात्राच्या रूपात सादर केले जाईल, असे त्याने स्पष्ट केले.




