कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ आता ओटीटीवर होणार रिलीज

Chandu Champion OTT Release Date| बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचा ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कमाई करू शकला नाही. 14 जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 73.5 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने खूप मेहनत घेतली होती.
आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट 12 दिवसांनी या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर येणार आहे. 9 ऑगस्ट 2024 रोजी हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होईल. त्यामुळे प्रेक्षकांना आता हा चित्रपट घरबसल्या पाहता येणार आहे.
चंदू चॅम्पियनमध्ये कार्तिकने मुरलीकांत पेटकरची भूमिका साकारली आहे. मुरलीकांत हे भारताचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते आहेत. कार्तिकसह राजपाल यादव, विजय राज आणि यशपाल शर्मा देखील या चित्रपटाचा भाग आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. याचे बजेट 120 कोटी रुपये आहे. कार्तिकलाही चंदू चॅम्पियनकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी केवळ 4.75 कोटी रुपयांची कमाई केली. Chandu Champion OTT Release Date|
कार्तिक आर्यनने ‘प्यार का पंचनामा’, ‘प्यार का पंचनामा 2’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘पति पत्नी और वो’, ‘लव्ह आज कल’, ‘भूल भुलैया 2’, ‘फ्रेडी’, ‘सत्यप्रेम की कथा’ सारख्या चित्रपटातही काम केले आहे. लवकरच तो ‘भूल भुलैया 3’ मध्ये दिसणार आहे. सध्या त्याच्या या चित्रपटासाठी चाहते देखील आतुर आहेत. Chandu Champion OTT Release Date|
हेही वाचा:
“निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची शरद पवारांची भाषा” ; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप




