कार्तिक आर्यनच्या ‘चंदू चॅम्पियन’ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात..; पहिल्या दिवशी किती गल्ला जमवला? पाहा

Kartik Aaryan | Chandu Champion | Box Office Collection : अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट शुक्रवारी, थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाबाबत बरीच चर्चा रंगली होती. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडूनही कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पहिल्या दिवसाची कमाई जाणून घेण्यापूर्वी दुसऱ्या दिवसाची आतापर्यंतची परिस्थिती काय आहे एकदा पाहुयात. मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक आर्यन आणि कबीर खानच्या या चित्रपटाने शनिवारी, 15 जून रोजी म्हणजेच दुस-या दिवशी 2.56 कोटींची कमाई केली आहे.
चंदू चॅम्पियन 14 जून रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. याआधी झालेल्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. कार्तिकलाही चंदू चॅम्पियनकडून मोठ्या अपेक्षा होत्या, चित्रपटाने भारतात पहिल्या दिवशी केवळ 4.75 कोटी रुपयांची कमाई केली.
View this post on Instagram
वीकेंडमध्ये चित्रपट यापेक्षा जास्त कमाई करू शकतो, अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत या चित्रपटाने दोन दिवसांत एकूण 7.31 कोटींची कमाई केली आहे. कार्तिक आर्यनच्या चित्रपटासमोर कोणतीही तगडी स्पर्धा नाही.
आता कार्तिक बॉक्स ऑफिसवर या शोची चुणूक दाखवू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चंदू चॅम्पियनमध्ये कार्तिकने मुरलीकांत पेटकरची भूमिका साकारली आहे.
त्याच्याशिवाय राजपाल यादव, विजय राज आणि यशपाल शर्मा देखील या चित्रपटाचा भाग आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले आहे. याचे बजेट 120 कोटी रुपये आहे.





