‘हेरा फेरी ३’मधून कार्तिक आर्यनचा पत्ता कट; परेश रावल यांचा खुलासा

Hera Pheri 3 | बॉलीवूड अभिनेते अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्या ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ ला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या आधीच्या दोन्ही भागात अक्षय-परेश-सुनील यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला होता. यादरम्यान ‘हेरा फेरी ३’मध्ये कार्तिक आर्यन पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु त्याचा या चित्रपटातून पत्ता कट करण्यात आला आहे. याबाबत परेश रावल यांनी एका मुलाखतीत माहिती दिली आहे.
परेश रावल यांनी सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत ‘हेरा फेरी ३’ च्या स्क्रिप्टबाबत विचारल्यावर ते म्हणाले, ‘मी अजून स्क्रीप्ट ऐकली नाही. पण नक्कीच असेल आणि असलीच पाहिजे. कारण लोकांना सिनेमाकडून खूप आशा आहेत. लोकांना सीक्वेल हवा आहे म्हणून मी तो साईन केला आहे. कदाचित काहीतरी चांगलं निघेल.’ Hera Pheri 3 |
कार्तिक आर्यनच्या ‘हेरा फेरी ३’ मधील एक्झिटबद्दल परेश रावलम्हणाले, ‘कार्तिक आर्यन सिनेमासाठी साईन झाला होता. तेव्हा सिनेमाची गोष्ट वेगळी होती. त्यात कार्तिकची भूमिका म्हणजे त्याला राजू समजून पकडून आणतात अशी होती. मी पूर्ण स्क्रीप्ट ऐकली नव्हती पण हे त्यात होतं. आता सिनेमात कार्तिक नाही कारण गोष्टच बदलली आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरपासून आम्ही शूटिंगला सुरुवात करणार आहोत.’ Hera Pheri 3 |
यासोबतच सीक्वेलबाबत बोलताना ते म्हणाले, मुन्नाभाई एमबीबीएस नंतर ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा खरा सीक्वेल आहे. जरा असा सिक्वेल बनवणार असाल तर सलाम आहे. पण जर फ्रँचायझीमधून फायदा घेण्यासाठी, पैसा कमावण्यासाठी करत असाल तर त्यात मजा नाही,” अशी स्पष्ट भूमिका परेश रावल यांनी व्यक्त केली.
दरम्यान, 2000 मध्ये कॉमेडी किंग दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली ‘हेरा फेरी’ हा चित्रपट सुरू झाला होता. ज्यामध्ये राजू (अक्षय कुमार), श्याम (सुनील शेट्टी) आणि बाबू राव (परेश रावल) यांचा ग्रुप एकत्र दिसत होता. हा चित्रपट यशस्वी झाला आणि त्याचा सिक्वेल हेरा फेरी 2006 मध्ये आला आणि त्याला प्रचंड यश मिळाले. आता त्याच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. Hera Pheri 3 |
हेही वाचा:
खासदार उदयनराजेंचा वाढदिवस जल्लोषात साजरा; शिवतीर्थावर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी





