Pune News : धायरीत अखिल रायकरनगर एकता मित्रमंडळातर्फे करपल्लवी गोंधळाचे आयोजन

प्रभात वृत्तसेवा
पुणे: धायरी, सिंहगड रोड येथील अखिल रायकरनगर एकता मित्रमंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सवात विविध उपक्रम राबवले जातात. यंदा मंडळाकडून करपल्लवी या प्राचीन भाषेतील गोंधळाचे आयोजन करण्यात आले.
करपल्लवी ही भाषा शिवरायांच्या हेर खात्याने प्रभावीपणे वापरून स्वराज्याच्या विस्ताराला गती दिली होती. या भाषेची ओळख जनतेला व्हावी व शिवरायांच्या पराक्रमाची आठवण जपली जावी या हेतूने हा गोंधळ आयोजित करण्यात आला, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष विजय बाप्पू रायकर यांनी दिली.
कार्यक्रमादरम्यान गोंधळीला कानात एखादे नाव सांगितले असता ते स्टेजवर अचूक ओळखत होते. परिसरातील नागरिक, आबालवृद्ध यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. धायरीतील रहिवाशांनी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजन संतोष थोपटे, दशरथ नागटिळक, निलेश ससाणे, प्रणव रायकर, सोमनाथ पोकळे यांनी केले होते.





