करोनाचा कहर! राज्यात 24 तासांत तब्बल 40,414 नवे रुग्ण

मुंबई – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून रविवारी सर्वाधिक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. राज्यात दिवसभरात 40,414 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. करोनाची वाढती रुग्णसंख्या राज्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे.
माहितीनुसार, राज्यात दिवसभरात राज्यात तब्बल 40 हजार 414 नव्या करोनारुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात 17 हजार 874 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 108 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यात आज 40,414 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 17874 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2332453 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 325901 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.95% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 28, 2021
दरम्यान, करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. मंत्रालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण बंदी घालावी. तसेच खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येने निर्बंध पाळत नसतील तर लाॅकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.





