“लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना एक कोटीचे बक्षीस”; क्षत्रिय करणी सेनेची मोठी घोषणा

karni sena on lawrence bishnoi । अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेत आला. सलमान खान सोबतच्या मैत्रीमुळे बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या सर्व घडामोडीत आता इतरांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईलाच आता जीवे मारण्यासाठी बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. क्षत्रिय करणी सेनेने लॉरेन्स बिश्नोईची हत्या करणाऱ्याला १ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांनाच हि ऑफर करण्यात आली आहे. जो पोलीस अधिकारी बिश्नोईचा एन्काऊंटर करेल त्याला करणी सेनेकडून एक कोटी ११ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. क्षत्रिय करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज शेखावत यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून घोषणा केली आहे.
बिश्नोईला सुरक्षा पुरविल्याबद्दल सरकारवर टीका karni sena on lawrence bishnoi ।
राज शेखावत म्हणाले की, “लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर कोणत्याही पोलिसाने केल्यास त्याला बक्षिसाची रक्कम देण्यात येईल. तसेच केंद्र आणि गुजरात सरकारने बिश्नोईला सुरक्षा पुरविल्याबद्दल करणी सेनेने टीका केली आहे. लॉरेन्स बिश्नोई अमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी सध्या गुजरातच्या साबरमती कारागृहात आहे. एप्रिमल महिन्यात सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणातही त्याचे नाव घेण्यात आले होते. मात्र तेव्हा मुंबई पोलिसांना त्याची कोठडी मिळाली नव्हती.
या कारणासाठी दिली बिश्नोईला मारण्याची धमकी karni sena on lawrence bishnoi ।
राज शेखावत यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये बिश्नोईच्या डोक्यावर बक्षीस जाहीर करण्याचे कारण सांगितले. सुखदेव सिंह गोगामेडी यांचा खून केल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोईच्या विरोधात करणी सेनेचा राग आहे. करणी सेनेचे प्रमुख असलेल्या सुखदेव सिंह गोगामेडी यांची ५ डिसेंबर २०२३ रोजी जयपूर येथे हत्या करण्यात आली होती. हत्येच्या काही तासांनंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.





