हायकोर्टाचा मोठा झटका…! कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची ‘या’ प्रकरणी याचिका फेटाळली
Updated On:

karnataka | कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी घोटाळ्यात त्यांच्यावर खटला चालवण्याचा राज्यपालांचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणारी त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने १२ सप्टेंबर रोजी सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण
कर्नाटकातील MUDA जमीन वाटप घोटाळ्याबाबत राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या प्रकरणी तपास सुरू करण्यास आणि सीएम सिद्धरामय्या यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या नोटीसबाबत सिद्धरामय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. न्यायालयाने 19 ऑगस्टचा अंतरिम आदेशही वाढवला.





