Ranji Trophy 2024/25 : पहिल्या दोन लढतीसाठी कर्नाटक संघाचे नेतृत्व मयंक अग्रवालकडे….
Updated On:

Ranji Trophy 2024/25 :- आगामी रणजी करंडक स्पर्धेत मध्य प्रदेश व केरळ संघाविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी मयंक अग्रवालकडे कर्नाटक संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. ११ ऑक्टोबर पासून मध्यप्रदेश सोबत तर १८ ऑक्टोबर पासून केरळ संघाबरोबर कर्नाटक संघाची लढत होणार आहे.
मयंक अग्रवाल, प्रसिद्ध कृष्णा यांच्याबरोबरीने देवदत्त पडिक्कल, विशक विजयकुमार, अष्टपैलू खेळाडू श्रेयस गोपाल हे देखील चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असणार आहेत.
कर्नाटक संघ : मयंक अग्रवाल (कर्णधार), निकिन जोस, देवदत्त पडिक्कल, आर स्मरण, मनीष पांडे, श्रेयस गोपाल, सुजय सातेरी, हार्दिक राज, विशक विजयकुमार, प्रसिद्ध कृष्णा, वासुकी कौशिक, लुवनीथ सिसोदिया, मोहसीन खान, विद्याधर पाटील, किशन बेदरे, अभिलाष शेट्टी.





