Karnataka Election: भाजप सरकारने गेल्या निवडणुकीत दिलेली 90 टक्के आश्वासने पुर्ण केलेली नाही; पोस्टरमधून वेधले लक्ष

बेंगळुरू – कर्नाटकमधील भाजप सरकारने गेल्या निवडणुकीत दिलेली 90 टक्के आश्वासने पुर्ण केलेली नाहींत या कडे लक्ष वेधण्यासाठी कॉंग्रेसने भाजप सरकारच्या विरोधात ‘पोस्टर वॉर’ सुरू केले आहे. बंगळुरू आणि राज्याच्या अनेक भागात या अनुषंगाने पोस्टर्स लावण्यात आली आहेत. या मोहीमेला त्यांनी ‘किवी मेले हुवा’ (कानावर फुले ठेवणे) असे नाव दिले आहे.
2018 च्या जाहीरनाम्यातील 90 टक्के आश्वासने पूर्ण करण्यात भाजप अपयशी ठरल्याबद्दल आणि 2022-2023 च्या अर्थसंकल्पातील केवळ 56 टक्के निधी वापरल्याबद्दल कर्नाटक कॉंग्रेसने भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप लोकांना फूल बनवत आहेत असे निर्देशित करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि इतर कॉंग्रेस आमदारांनी फुले उधळून अनोखे आंदोलन केले.
‘किवी मेले हूवा’ हे एक पत्रक आहे ज्यात भाजपच्या पोस्टरवर कानात फुलं चिकटवली आहेत.कॉंग्रेसच्या या आंदोलनाला प्रत्त्यत्तर म्हणून भाजपने कॉंग्रेसला भ्रष्ट पक्ष म्हणून चित्रित करण्यासाठी “थट अंत हेली” (त्वरित उत्तर द्या) ही ट्विटर मोहीम सुरू केली.




