बस पलटी होऊन भीषण अपघात, 8 ठार, 20 जखमी; मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश

कर्नाटकातील तुमकूर जिल्ह्यातील पावागडाजवळ शनिवारी बस पलटी होऊन भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Karnataka | Eight dead and more than 20 critically injured including students as a bus overturned near Pavagada in Tumkur district: Tumkur Police
Further details awaited. pic.twitter.com/9fNqWD1r6T
— ANI (@ANI) March 19, 2022
या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचले आहे. बचाव कार्य सुरु असून जखमींना बंगळुरू येथील रुग्णालयात रुग्णालयात नेण्यात आले आहे. अशी माहिती तुमकूर पोलिसांनी दिली आहे.





