Congress Crisis : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ अल्पसंख्याक नेते के. अब्दुल जब्बार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. (Congress Crisis) जब्बार यांनी राज्य काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत तो डी. के. शिवकुमार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. दावणगेरे पोटनिवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय घडामोडींमुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे राज्यातील सरकारमध्ये फेरबदल करण्यात यावा, मंत्रिमंडळाचा विस्तार व्हावा यासाठी ३० आमदारांनी दिल्ली गाठली आहे. दुसरीकडे दावणगेरे पोटनिवडणुकीची धामधूम असतानाच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. Congress Crisis Congress Crisis : काँग्रेसला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा; अंतर्गत वाद चिघळले दावणगेरे दक्षिण पोटनिवडणुकीत अल्पसंख्याक उमेदवाराला तिकीट नाकारण्यात आल्याने पक्षातील असंतोष उफाळून आला. यामुळे राज्यभरातील अल्पसंख्याक नेत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे जब्बार यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केले आहे. Congress Crisis तसेच, पक्षाच्या निवडणूक रणनीतीत अल्पसंख्याक नेत्यांचा योग्य सल्ला घेतला जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. केवळ दावणगेरेच नव्हे, तर संपूर्ण राज्यात अल्पसंख्याकांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Congress Crisis) याशिवाय, बी. झेड. जमीर अहमद खान यांना प्रचारापासून दूर ठेवण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. या प्रकारामुळे अल्पसंख्याक समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याचे त्यांनी म्हटले. या राजीनाम्यानंतर कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले असून, आगामी निवडणुकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Congress Crisis)