Video : विधानसभा आहे की जत्रा? मुस्लिम आरक्षणावरून कर्नाटकात गोंधळ, आमदारांना चक्क खांद्यावर उचलून काढले बाहेर

Karnataka Muslim Quota Bill | मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावरून कर्नाटक विधानसभेत प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. कर्नाटक सरकारकडून सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भातील विधेयकाला मंजूरी मिळाली आहे. मात्र, भाजप आमदारांकडून या विधेयकाला जोरदार विरोध करण्यात आला.
विरोध करताना आमदारांकडून विधेयकाच्या प्रती देखील विधानसभेच्या अध्यक्षांवर भिरकावण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. भाजप आमदारांनी विधेयकाला विरोध करताना गोंधळ घातल्याने विधानसभा अध्यक्ष यूटी खदार यांनी मार्शल बोलावून या आमदारांना सदनातून बाहेर काढले. विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करत भाजपच्या 18 आमदारांना पुढील सहा महिन्यांसाठी विधानसभा कार्यवाहीतून निलंबित केले आहे.
#WATCH | Bengaluru: 18 Karnataka BJP MLAs being carried out of the Assembly after their suspension.
The House passed the Bill for their suspension for six months for disrupting the proceedings of Assembly. The Bill was tabled by Karnataka Law and Parliamentary Affairs Minister… pic.twitter.com/KKss0M9LVZ
— ANI (@ANI) March 21, 2025
विधानसभा अध्यक्षांनी आमदारांनी पदाचा अनादर केल्याचा आरोप करत 18 आमदारांना निलंबित केले. त्यानंतर मार्शलने निलंबित भाजप आमदारांना थेट खांद्यावर उचलत विधानसभेतून बाहेर नेले. याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सदनात कार्यवाहीदरम्यान विरोधी पक्षातील भाजप आणि जनता दलाच्या (एस) नेत्यांनी एका मंत्री आणि इतर राजकारण्यांशी संबंधित कथित ‘हनी-ट्रॅप’ प्रकरणाची न्यायालयीन चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाकडून करावी अशी मागणी केली.
याशिवाय, मुस्लिम आरक्षण विधेयक व हनी ट्रॅपच्या मुद्यावरून विधानसभेत गोंधळ सुरू असतानाच सरकारने मुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांच्या पगारात 100 टक्के वाढ करण्याचे विधेयक देखील मंजूर केले.





