नगर – गुरुकुल मंडळाच्या कर्जत शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी आज घोषित करण्यात आल्या. त्यात शिक्षक समितीच्या अध्यक्षपदी अशोक घालमे व गुरुकुल मंडळाच्या अध्यक्षपदी अनिल बंडगर यांनी निवड जाहीर करण्यात आली.
शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरमध्ये झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारीणी निवडण्यात आली. त्यामध्ये महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मनिषा साळुंके, मार्गदर्शक समितीच्या अध्यक्षपदी नवनाथ परहर, सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षपदी संतोष अनभुले यांची निवड जाहिर करण्यात आली.
करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत ऑनलाइन पध्दतीने या निवडी बिनविरोध केल्याचे शिक्षक नेते डॉ. कळमकर म्हणाले. ऑनलाइन निवडप्रक्रियेत गुरुकुल मंडळाचे नेते रा. या. औटी, संजय धामणे, सुदर्शन शिंदे, नितिन काकडे, सिताराम सावंत, वृषाली कडलग, राजेंद्र ठाणगे, विजय काकडे, भास्कर नरसाळे, संजय नळे, सुखदेव मोहिते, शिवाजी रायकर, दशरथ देशमुख, मधुकर रसाळ, ईश्वर माने, अतुल घालपे, रामदास भापकर, गहिनीनाथ शिंदे, चंद्रकांत गावडे, जालिंदर गोरे यांनी सहभाग घेतला.
कार्यकारिणीतील कार्याध्यक्ष व सरचिटणीसपदे पुढीलप्रमाणे
शिक्षक समिती : नवनाथ पाटील, शहाजी बाराते, प्रशांत निंभोरे. गुरुकुल मंडळ : भालचंद्र शिंदे, ज्ञानदेव जाधव, दत्तात्रय पोकळे. महिला आघाडी : मंगल अनभुले, रत्नमाला देशमुख. मार्गदर्शक समिती : रामचंद्र वारगड, अशोक खराडे. सांस्कृतिक समिती : पांडूरंग गांगर्डे, किसन आटोळे, शरद पवार.