Karishma Kapoor : करिश्मा कपूरचा थरारक अवतार! ‘ब्राऊन’चा ट्रेलर पाहून चाहते झाले उत्सुक
Karishma Kapoor : मात्र हा तपास जितका गुंतागुंतीचा आहे, तितकेच तिचे खाजगी आयुष्य देखील गुंतागुतींचे दाखवण्यात आले आहे.

Karishma Kapoor : 90 च्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर आता दमदार कमबॅक करत आहे. ती एका नवीन वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
या वेबसिरीजचे नाव ‘ब्राऊन’ (Brown) असून, ही तिची बहुप्रतीक्षित सस्पेन्स-थ्रिलर वेबसिरीज आहे. लवकरच ही वेबसिरीज प्रदर्शित होणार असून, या वेबसिरीजचा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज झाला आहे. (Karishma Kapoor)
रहस्य, गुन्हेगारी आणि भावनिक संघर्ष या धर्तीवरील कथा या वेबसिरीजमध्ये बघायला मिळणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
‘ब्राऊन’च्या ट्रेलरची सुरुवात एका रहस्यमय खुनापासून होते. या खुनाचा तपास करण्याची जबाबदारी पोलीस अधिकारी रीटा ब्राऊन अर्थात करिश्मा कपूरवर सोपवली जाते. मात्र हा तपास जितका गुंतागुंतीचा आहे, तितकेच तिचे खाजगी आयुष्य देखील गुंतागुतींचे दाखवण्यात आले आहे. (Karishma Kapoor)
भूतकाळातील काही जखमा आणि दारूच्या व्यसनाशी झुंज देत असतानाही ती आपले कर्तव्य निभावताना दिसते. या वेबसिरीजचे आणखी एक आकर्षण म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री हेलन विशेष भूमिकेत झळकल्या आहेत. त्या दीर्घ काळानंतर स्क्रीनवर दिसणार असून ट्रेलरमधील त्यांची झलक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. (Karishma Kapoor)
हेही वाचा : Manoj Jarange : उपोषण सुरू होताच सरकार ॲक्शन मोडमध्ये! मनोज जरांगेंना 5 मोठी आश्वासन, उपोषण मागे घेणार?
करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि हेलन यांच्यासोबत सोनिया राझदान, सूर्या शर्मा आणि बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता जिस्सू सेनगुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Karishma Kapoor : करिश्मा कपूरचा थरारक अवतार! ‘ब्राऊन’चा ट्रेलर पाहून चाहते झाले उत्सुक
वेबसिरीजची कथा बंगाली पार्श्वभूमीवर आधारित असून ती अभिक बरुआ यांच्या गाजलेल्या ‘सिटी ऑफ डेथ’ या कादंबरीवर आधारित आहे.
रहस्य, थरार आणि भावनिक संघर्ष यांचा संगम असलेली ‘ब्राऊन’ ही वेब सीरिज ५ जूनपासून झी फाईव्ह या ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेबसिरीजमध्ये करिश्मा कपूरला दमदार भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. (Karishma Kapoor)
हेही वाचा : DK Sivakumar : सिद्धारामय्यांनंतर ‘डीके शिवकुमार’ पर्वाची सुरुवात? संभाव्य मंत्रिमंडळाची यादी आली समोर





