Karishma Tanna : बाळाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच करिश्मा कॅमेऱ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Karishma Tanna : करिश्मा आणि वरुणने पापाराझींसमोर दिली पोज

Karishma Tanna : अभिनेत्री करिश्मा तन्नाने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलाला जन्म दिला. २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमेला करिश्माला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. करिश्मा आणि पती वरुण बंगेरा दोघांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन झालं. त्यानंतर आता करिश्मा तन्नाला रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला आहे. बाळाच्या जन्मानंतर पहिल्यांदाच करिश्मा कॅमेऱ्यासमोर दिसली.
करिश्मा पती वरुणसोबत रुग्णालयाबाहेर बेबी बॉयला घरी घेऊन जात आहेत. त्यांनी बाळाला बेबी व्हील कॅरियरमध्ये ठेवलं आहे. बाळाची झलक दिसली नसली तरी करिश्मा आणि वरुणने हसत पापाराझींसमोर पोज दिली. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. करिश्मा आणि वरुण बाळाचं नाव काय ठेवणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
बाळाच्या जन्मानंतर करिश्मा आणि वरुण यांनी सोशल मीडियावरील संयुक्त पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली होती. या पोस्टमध्ये लिहिले होते की, “आमच्या मुलाचं आगमन झालं आहे. गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी आमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद आमच्याकडे आला आहे. 29 जुलै 2026… आमच्या छोट्या पाहुण्याचं या जगात मनापासून स्वागत.”
View this post on Instagram
दरम्यान, करिश्माने वयाच्या ४२ व्या वर्षी बाळाला जन्म दिला आहे. प्रेग्नंसीमध्ये तिचा फिटनेस पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले होते. अगदी शेवटच्या महिन्यापर्यंत ती जिममध्ये वर्कआउट करत होती. गरोदरपणाच्या काळात करिश्मा अनेकदा तिच्या या प्रवासाची झलक दाखवत असे. यावरुन तिचं कौतुक करण्यात आलं होतं. तर काहींनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.
करिश्मा आणि वरुणचे लग्न
करिश्मा आणि वरुण फेब्रुवारी २०२२ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. यावर्षी एप्रिलमध्ये या जोडप्याने पहिल्या बाळाच्या आगमनाची बातमी शेअर केली होती. त्यानंतर आता त्यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे.
हेही वाचा:





